स्वारगेट बलात्कार पीडितेसोबत ससून रुग्णालयातही असंवेदनशील कृत्य, संतापजनक घटना
पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवरील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार प्रकरणात नवनव्या धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सुरुवातील या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांकडून दोघांमध्ये सहमतीने संबंध झाल्याचा दावा केला जात होता.
तर गाडेने महिलेला पैसे दिल्याचा घृणास्पद आरोपही गाडेच्या वकिलांनी केला होता. दरम्यान या प्रकरणात आणखी एक असंवेदनशील कृत्य समोर आली आहे.
पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या प्रकरणात पोलिसांपाठोपाठ आता पुण्यातील सरकारी रुग्णालय ससूनचे प्रशासनही असंवेदनशील झाल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार, बलात्कार पीडितेचे वैद्यकीय तपासणी एखाद्या महिला डॉक्टरकडून केली जावी. मात्र स्वारगेट पीडितेची वैद्यकीय तपासणी एका पुरुष स्त्रीरोग तज्ज्ञामार्फत करण्यात आली होती. यावेळी तिच्यासोबत एक महिला ट्रेनी डॉक्टर असल्याची माहिती ससून रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. महिला डॉक्टरांचे पद रिक्त असल्याने स्वारगेट पीडितेची पुरुष डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
बलात्काराची केस मागे घेण्यासाठी पीडितेच्या कुटुंबावर दबाव...
या प्रकरणात पीडितेवर संशय व्यक्त केला जात होता. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी गाडेच्या वकिलांकडून दोघांमध्ये सहमतीने संबंध झाल्याचा दावाही केला जात होता. सोशल मीडियावरही पीडितेचं चारित्र्यहनन केलं जात असल्याचं समोर येत आहे. मात्र स्वत:चा जीव वाचविण्यासाठी तिने प्रतिकार केला नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आता तर बलात्काराची केस मागे घेण्यासाठी पीडितेच्या कुटुंबीयांवर दबाव टाकला जात आहे, अशी माहिती पीडितेचे वकील असीम सरोदे यांनी दिली आहे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.