Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ब्रज होळीत मुस्लिमांना बंदी; मुस्लिम कायदा काय सांगतो? मुस्लिमांनी होळी खेळावी की नाही? वाचा...

ब्रज होळीत मुस्लिमांना बंदी; मुस्लिम कायदा काय सांगतो? मुस्लिमांनी होळी खेळावी की नाही? वाचा...
 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभात येण्यास मुस्लिमांना बंदी केली होती. आता ब्रजमधील होळीबाबत एक नवीन मागणी समोर आली आहे. मथुरेच्या संतांनी होळीच्या दिवशी ब्रजमध्ये मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सनातनविरोधात मुस्लिम समाज कट रचत असल्याचा आरोप, संतांनी केला आहे. ब्रजमध्ये मुस्लिम दुकानांवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे. ब्रजमध्ये होळीच्या वेळी संतांचा एक गट पहारा देईल, असेही सांगितले जात आहे.

मथुरेतील या निर्णयाचे पडसाद संपूर्ण देशभर पडले आहेत. समाजवादी पक्षाने स्थानिक संतांच्या मागण्या भाजप आणि आरएसएसशी जोडल्या आहेत. भारतीय जनता पक्ष आणि संघ मिळून देशाचे विभाजन करत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीने केला आहे. आम आदमी पक्षानेही या प्रकारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दुसरीकडे विश्व हिंदू परिषद या मागणीचे समर्थन करत आहे. सध्या याच एका मुद्यावर देशभरातील राजकारण चांगलेच तापले आहे.
काय आहे संतांची मागणी

धर्मरक्षा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सौरभ गौर यांनी रविवारी एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यात म्हटले आहे की, "अलीकडेच बरेलीमध्ये असे दिसून आले की मुस्लिम समुदायातील लोक आपल्या लोकांना धमकावत होते. अशा परिस्थितीत, धर्मरक्षक संघाने निर्णय घेतला आहे की आम्ही ब्रज क्षेत्रातील मथुरा, वृंदावन, नांदगाव, बरसाणा, गोकुळ, दौजी इत्यादी तीर्थस्थळांवर होळी उत्सवादरम्यान मुस्लिम समुदायातील लोकांना प्रवेश बंदी घालू.

मुस्लिम नेत्यांमध्ये होईना एकमत
या सगळ्या राजकारणात मुस्लिम धार्मिक नेते निषेधाबद्दल एकमत नसल्याचे दिसत आहे. ऑल इंडिया मुस्लिम जमातने ब्रजमध्ये मुस्लिमांना होळी साजरी करण्यास बंदी घालणे असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे ऑल इंडिया इमाम असोसिएशनने इस्लाममध्ये होळीला परवानगी नसल्याचे सांगितले आहे.
होळीबद्दल इस्लाम काय म्हणतो?

इस्लाम तौहीद म्हणजेच एकेश्वरवादावर आधारित आहे. इतर कोणत्याही धर्माच्या उपासनेशी संबंधित कोणत्याही कृतीपासून दूर राहण्याचे इस्लाममध्ये सांगितले गेले आहे. होळी हा हिंदू धर्माशी संबंधित धार्मिक सण असल्याने, काही मुस्लिम विद्वानांचे मत आहे की इस्लामिक दृष्टिकोनातून त्यात सहभागी होणे योग्य नाही.

होळी टाळण्याचा सल्ला
शरिया कायद्यानुसार मुस्लिमांनी अशा सणांपासून किंवा परंपरांपासून दूर राहिले पाहिजे, जे इस्लामिक शिकवणींनुसार नाहीत. इस्लाम इतर धर्मांच्या लोकांसोबत चांगले वर्तन, आदर आणि शांततापूर्ण सौदार्ह शिकवतो. अशा परिस्थितीत, मुस्लिम त्यांच्या गैर-मुस्लिम मित्रांना आणि शेजाऱ्यांना त्यांच्या सणांच्या शुभेच्छा देऊ शकतात, परंतु धार्मिक पद्धतीने असे सण साजरे करणे टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.