भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या वाहनावर लंडनमध्ये खलिस्तानी समर्थकांनी हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. एका चर्चेसाठीच्या बैठकीनंतर 'कॅथनम हाऊस' इथून बाहेर पडत असताना हा प्रकार घडला. यावेळी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसंच लंडन पोलिसांसमोरच त्यांनी भारताचा राष्ट्रध्वज फाडला.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती आक्रमकपणे जयशंकर यांच्या ताफ्याकडे जाताना दिसतो आहे. सुरुवातीला काही अधिकाऱ्यांनी या व्यक्तीला अडवण्याचा प्रयत्न केला पण आक्रमक होताना दिसतो आहे. तसंच काही खलिस्तान समर्थक हा भारताचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा झेंडा फाडताना दिसत आहेत तर इतर काहीजण घोषणाबाजी करत आहेत. यानंतर काही वेळातच लंडन पोलीस घटनास्थळी दाखल होत या लोकांना बाजुला करतात. तर दुसऱ्या एका व्हिडिओत आणखी काही खलिस्तानी समर्थक जयशंकर हे ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत बैठकीसाठी थांबले आहेत त्या ठिकाणाबाहेर आंदोलन करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये खलिस्तानी झेंडे आणि समर्थनार्थ घोषणाबाजी करताना लोक दिसत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.