सांगली : धनादेश न वटल्याने मिरजेतील महिलेला १० महिन्यांचा तुरुंगवास आणि तब्बल १० लाख ६५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. फरजाना शहाबुद्दीन पीरखान (रा. किल्ला भाग, मिरज) असे तिचे नाव आहे. सांगली येथील आठवे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शुभांगी नलवडे यांनी सोमवारी
(दि. ३) हा निकाल दिला. खटल्याची माहिती अशी : महेश फिरोजी खोत यांनी
मिरजेतील गुलमोहर कॉलनीत मनीषा अपार्टमेंटमध्ये सदनिका खरेदीसाठी फरजाना
पीरखान यांच्यासोबत करार केला होता.
त्यासाठी अनामत स्वरुपात काही रक्कम फरजाना यांना दिली होती. कालांतराने काही कारणांनी हा करार रद्द झाला. त्यामुळे फरजाना यांनी ही सदनिका अन्य ग्राहकाला विकली. करार रद्द झाल्याने खोत यांना पैशांची परतफेड व नुकसान भरपाईपोटी ६ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यासाठी फरजाना यांनी खोत यांना धनादेश दिला. पण हा धनादेश बॅंकेतून न वटता परत आला.
खोत यांनी फरजाना यांच्याकडे पैशांसाठी पाठपुरावा करुनही त्यांनी पैसे दिले
नाहीत. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. दाव्याचा निर्णय देताना
न्यायालयाने फरजाना यांना तुरुंगवास व दंडाची शिक्षा ठोठावली. खोत
यांच्यावतीने ॲड. चिराग सोनेचा यांनी काम पाहिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.