Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यपालांच्या बंगल्यासाठी 48 एकर जागा कशाला, ती जागा शिवस्मारकाला द्या, उदयनराजेंची मागणी

राज्यपालांच्या बंगल्यासाठी 48 एकर जागा कशाला, ती जागा शिवस्मारकाला द्या, उदयनराजेंची मागणी



राज्यपालांच्या निवासस्थानासाठी 48 एकर जागा ठेवली आहे. ती कशाला पाहिजे राज्यपालांच्या निवासस्थानाची जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकासाठी द्या, अशी मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. या सारखी अरबी समुद्राच्या बाजूला जागा कुठेही मिळू शकणार नाही. याबाबतची मागणी राज्य आणि केंद्राकडे केली असल्याचे माहिती देखील उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. सातारा येथे उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. 


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी यांनी अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक व्हावं अशी मागणी केली होती. जर अरबी समुद्रात स्मारक होणे शक्य नसेल तर राज्यपाल भवनात छत्रपती शिवाजी महाराजांचे व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. आता उदयनराजे भोसले यांनी यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, 48 एकर म्हणजे किती जागा झाली. त्यांना आठ एकर जागा पण खूप झाली. अरबी समुद्रात पुतळा बांधला तरी अनेक अडचणी निर्माण होतील. त्याच्या बाजूला 48 एकर आहे. महापौरांच्या बंगल्याचे स्मारक झालेच ना. राज्यपालांना दुसरीकडे जागा बांधून द्या. कारण त्याच्यासारखा दुसरा स्पॉट नाही, असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांच्या बंगल्यासाठी 48 एकर जागा कशाला, ती जागा शिवस्मारकाला द्या, अशी पुन्हा एकदा मागणी केली.
शिवसेनेच्या नावातच शिवाजी महाराजांचे शिव, पण त्यांनी....

उदयनराजे भोसले पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांचा अवमान होऊ नये, यासाठी कायदा या आधीच काँग्रेस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात व्हायला हवा होता. शिवसेनेच्या नावातच शिवाजी महाराजांचे शिव आहे. पण त्यांनीही केले नाही, असा म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. आता कायदा होत आहे. ते काम माझ्याकडून होत आहे. हे माझ्या आयुष्यातील मोठे काम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 
उदयनराजेंच्या निळ्या शर्टची जोरदार चर्चा
दरम्यान, आज पत्रकार परिषदेला खासदार उदयनराजे निळा रंगाचा शर्ट घालून आले होते. याबाबत त्यांना विचारलं असता निळा रंग हा माझा आवडीचा रंग असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उदयनराजे यांनी परिधान केलेल्या निळ्या रंगाच्या शर्टची आता जोरदार चर्चा रंगली आहे. तर थोरले प्रतापसिंह महाराज यांनी महिलांची पहिली शाळा सुरू केली. त्याचे अनुकरण महात्मा फुले यांनी केलं. या वक्तव्याबाबत खासदार उदयनराजे यांनी मी या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.