धक्कादायक! आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत अनर्थ, २३ वर्षीय तरूणाचा मृत्यू; डीजेमुळे नाका तोंडातून रक्तस्राव
डिजेच्या आवाजामुळे एका २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं काढलेल्या मिरवणुकीत डीजे सुरू असताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. डी जे सुरू असताना अचानक तरूणाच्या
नाकातून आणि कानातून रक्तस्राव झाला. त्यानंतर त्याला तातडीने खासगी
रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्राणज्योत मालवली. ही
धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली असून, पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक
मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
डी जेच्या आवाजामुळे तरूणाचा मृत्यू
आज डॉ. बाबासाहेब यांची जयंती. आंबेडकर जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी भव्य मिरवणूक काढण्यात येते. मात्र, नाशिकमध्ये एक दुर्देवी घटना घडली. डॉ. बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डी जेच्या कर्कश आवाजामुळे एका तरूणाचा मृत्यू झाला. नितीन रणशिंगे (वय वर्ष २३) असे मृत तरूणाचे नाव आहे. नाशिक शहरातील पेठ रोडवरील फुलेनगर येथील तो रहिवासी होता.
नेमकं काय घडलं?
नाशकात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली
होती. या मिरवणुकीत तरूण देखील सहभागी झाला होता. मात्र, डी जे च्या
आवाजामुळे तो जागीच कोसळला. अचानक त्याच्या नाकातून आणि कानातून
रक्तस्त्राव सुरू झाला. उपस्थितांनी त्याला तातडीने नाशिक जिल्हा रूग्णलयात
दाखल केले.
तरूणाला क्षयरोगाचा त्रास
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासले असता, तरूणाला मृत घोषित केले. दरम्यान, नितीन या तरूणाला क्षयरोगाचा त्रास असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टेम अहवाल समोर आल्यानंतरच स्पष्ट होईल. तरूणाचा मृत्यू डी जेच्या मोठ्या आवाजामुळे झाला की, इतर आरोग्यविषयक कारणांमुळे झाला, हे निष्पन्न होणे बाकी आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.