कोल्हापूर: दिवसा बँकेचा सुरक्षा रक्षक अन् रात्रीच्या वेळी घरफोड्या; कोल्हापूर पोलिसांनी सराईत आरोपीला ठोकल्या बेड्या, पुढं आला मोठा कारणामा
कोल्हापूर जिल्ह्याच्या गुन्हेगारी विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात दिवसा बँकेचा सुरक्षा रक्षक असलेल्या व्यक्तिचा प्रताप समोर आला आहे. जो दिवसा एक जवाबदार बँकेचा सुरक्षा रक्षक म्हणून वावरत होता. मात्र रात्रीच्या वेळी घरफोड्या करून अनेकांच्या पैशावर डल्ला मारत होता. सागर रेणुसेला असे या आरोपीचे नाव असून अखेर कोल्हापूर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पुढे आलेल्या माहितीनुसार, पेट्रोल चोरी करताना लोकांना सापडलेल्या सागर कडून घरफोडीचे तब्बल 14 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून तो गेली चार वर्ष घरफोड्या करत होता, हे समोर आले आहे. मध्यरात्री एकटाच घराच्या बाहेर पडत होता त्यामुळे त्याच्या चोऱ्यांबाबत कोणतेही रेकॉर्ड यापूर्वी मिळू शकले नव्हते.
मोठ्या धामधूममध्ये लग्न केलं, पण पत्नी माहेरी गेल्यानंतर पुन्हा.....
कसबा बावड्यातील सार्वजनिक सीसीटीव्हीची सगळी माहिती सागरला होती. त्यामुळे पोलीस तपास करताना अर्ध्यापर्यंतच जाऊन माघारी फिरत होते. सागरने चोरलेल्या रकमेतूनच मोठ्या धामधूममध्ये लग्न केलं. लग्न झाल्यानंतर एक वर्ष सागरने कोणतीही चोरी केली नाही. मात्र गर्भवती राहिलेली पत्नी माहेरी गेल्यानंतर त्याने पुन्हा चोरी करण्यास सुरुवात केली. घरची परिस्थिती तशी चांगली होती त्यामुळे सागरवर कोणालाही शंका आली नाही. मात्र आता पेट्रोल चोरीच्या निमित्ताने सागर कडून तब्बल 14 गुन्हे उघडकीस आले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
16 वर्षाच्या मुलीने छळास कंटाळून केली आत्महत्या, चौघांविरुद्ध पोलिसांत तक्रार
बारामती तालुक्यातील को-हाळे खुर्द येथील 16 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अंकिता कडाळे असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. या विद्यार्थिनीने 8 एप्रिल 2025 रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तिला काही दिवसांपासून विशाल दत्तात्रय गावडे आणि त्याचे मित्र प्रविण गावडे, शुभम गावडे व सुनील खोमणे यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विशाल गावडे तिचा पाठलाग करत होता, तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि नकार दिल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून अंकिताने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.