Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खुर्चीसाठी पहलगाम हल्ला.पाकिस्तानी पत्रकाराने सांगितले मास्टरमाइंडचे नाव

खुर्चीसाठी पहलगाम हल्ला.पाकिस्तानी पत्रकाराने सांगितले मास्टरमाइंडचे नाव
 

पहलगाममधील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता ‘आर-पार’ची भाषा करत पाकिस्तानला कठोर शब्दांत संदेश दिला आहे. त्याचवेळी पाकिस्तानमधील पत्रकाराने मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या आदेशावरून हा हल्ला झाल्याचा दावा पत्रकार आदिल राजा यांनी केला आहे. आदिल राजा यांनी पाकिस्तानी गुप्तचर सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, असीम यांनी पहलगाममध्ये जाणूनबुजून हल्ला केला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्याला विश्रांती देता येईल. आदिल राजा हे पाकिस्तानचे एक वरिष्ठ पत्रकार आहेत आणि ते ह्यूमन राईट्स वॉचसाठी काम करतात.

आदिल राजा यांनी म्हटले की, मी जेव्हा ही पोस्ट लिहीत आहे, तेव्हा लोक मला भारताचे एजंट म्हणतील. परंतु मुनीर यांच्या आदेशानंतर पहलगाव हल्ला झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑफ रिकॉर्ड हे मला सांगितले आहे. मुनीर यांनी आधी विदेशातील पाकिस्तानी लोकांना बोलवले. मग चिथावणीखोर भाषण केले. त्यानंतर असा हल्ला घडवून आणला. मुनीरच्या चुकीचे परिणाम संपूर्ण पाकिस्तानला भोगावे लागणार आहे. शाहबाज यांनी मुनीर यांना तात्काळ काढून टाकावे अन्यथा पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिकट होईल. आदिल राजा यांची ही पोस्ट माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाच्या समर्थकांकडून चांगलीच शेअर केली जात आहे. इम्रान समर्थकांचे म्हणणे आहे की, जर मुनीर याला काढून खानला परत आणले तरच पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारू शकते.

कोण आहे आदिल राजा?
पेशावरचे रहिवासी असलेले आदिल राजा हे पाकिस्तानमधील ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण इस्लामाबाद येथील कायद-ए-आझम विद्यापीठातून घेतले. आदिल १७ वर्षांपासून पाकिस्तानी पत्रकारितेत सक्रिय आहे. सध्या ते ‘सोल्जर्स की सुनो’ नावाचा ब्लॉग चालवतात. आदिल यांचे सोशल मीडियावर १६ लाख फॉलोअर्स आहेत. पीपीपीचे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी हे देखील आदिल यांचे फॉलोअर्स आहे. आदिल अनेकदा इम्रान खान यांच्यासाठी लिहितात. आदिलची गणना पाकिस्तानातील अशा पत्रकारांमध्ये होते जे लष्कर आणि सरकारविरुद्ध आवाज उठवत राहतात.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.