हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या कार्यक्रमादरम्यान भाजप नेते मनीष सिंह यांना स्टेजवर जाण्यापासून रोखणे डीएसपी जितेंद्र राणा यांना चांगलेच महागात पडले आहे. सिंह हे ओडिशाचे माजी राज्यपाल गणेशी लाल यांचे पुत्र आहेत. सिरसाच्या मोठ्या उद्योगपतींपैकी ते एक आहेत. याशिवाय ते हरियाणा भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य देखील आहेत.
नेमकं प्रकरण काय?
हरियाणातील सिरसा येथे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्थानिक भाजप नेते मनीष सिंह हे देखील तिथे उपस्थित होते आणि ते मुख्यमंत्र्यांच्या स्टेजकडे जाऊ लागले. तेव्हा तिथे उपस्थित असलेले डीएसपी जितेंद्र राणा यांनी त्यांना थांबवले. त्यानंतर मनीष सिंह हे संतापले आणि त्यांनी डीएसपी जितेंद्र कुमार राणा यांना माफी मागण्यास सांगितले.
प्रकरण वाढल्यानंतर डीएसपी जितेंद्र राणा यांनी भाजप नेते मनीष सिंह यांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागितली. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये डीएसपी जितेंद्र कुमार राणा आणि भाजप नेते मनीष सिंह हे दिसत आहेत, जिथे डीएसपी भाजप त्यांची माफी मागताना दिसत आहेत. हा व्हिडिओ मनीष सिंह यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरही प्रसिद्ध केला आहे.
जितेंद्र राणा म्हणाले की ते, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात सुरक्षा ड्युटीवर होते आणि त्यांना सायकल ट्रॅकजवळ उभे असलेले मनीष सिंह ओळखता आले नाही त्यामुळे त्यांनी त्यांना आणि इतर लोकांना तेथून थोडं दूर जाण्यास सांगितले. तो याबद्दल माफी मागतो. मनीष सिंह यांच्याशी मी चुकीचं वागलो म्हणूनच मी त्यांची माफी मागतो. डीएसपी जितेंद्र राणा यांचा हा व्हिडिओ सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
मनीष सिंह म्हणाले...
यानंतर मनीष सिंह म्हणाले की, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला हरियाणा पोलिसांबद्दल पूर्ण आदर आहे. ते जितेंद्र राणा यांना यापूर्वी कधीही भेटले नव्हते. ज्यामुळे ते मला ओळखू शकले नाही. आता त्यांनी माफी मागितली असून माझी तक्रार नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.