LPG Cylinder Delivery: आता एलपीजी सिलेंडर घरपोच मिळणार नाही, कारण..
एलपीजी डिस्ट्रीब्युटर्स युनियनने केंद्र सरकारला पत्र लिहून एलपीजी वितरणावरील कमिशन किमान १५० रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. एलपीजीचा पुरवठा हा मागणी आणि उपलब्धतेवर आधारित असावा, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच, कंपन्या कोणतीही मागणी न करता वितरकांकडे जबरदस्तीने बिगर-घरगुती सिलिंडर पाठवत असून, हे कायदेशीर तरतुदींविरोधात असल्याचा आरोप युनियनने केला आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत सिलिंडर वितरणातही अडचणी निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीन महिन्यांनंतर संघटना प्रदीर्घ संपावर जाईल, असा इशाराही या पत्रामध्ये देण्यात आला आहे.
अलीकडेच सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली आहे. त्यानंतर आता एलपीजी डिस्ट्रीब्युटर्स युनियनने सरकारला संपाचा इशारा दिला आहे. जर आगामी तीन महिन्यांत वाढीव कमिशनसह त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर संघटना संपावर जाणार असल्याचा इशारा रविवारी दिला. या संदर्भात शनिवारी भोपाळ येथे झालेल्या संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात निर्णय घेण्यात आला, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष बी. एस. शर्मा यांनी दिली. त्यांनी सांगितले की, मागण्यांच्या सनदेसंदर्भातील प्रस्तावाला देशभरातील विविध राज्यांतील सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली आहे. एलपीजी वितरकांच्या मागण्यांसंदर्भात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाला पत्र एलपीजी वितरकांना सध्या दिले जाणारे कमिशन अत्यंत कमी असून ते त्यांच्या परिचालन खर्चाशी जुळणारे नाही, असे आम्ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
कमिशन वाढवण्याची मागणी
संघटनेने केंद्र सरकारला पत्र लिहून एलपीजी वितरणावरील कमिशन किमान १५० रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. पत्रात म्हटले आहे की एलपीजीचा पुरवठा मागणी आणि पुरवठ्यावर आधारित असतो. परंतु, तेल कंपन्या कोणतीही मागणी नसताना जबरदस्तीने बिगर घरगुती सिलिंडर वितरकांना पाठवत आहेत, जे कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन आहे. हे त्वरित थांबवावे. उज्ज्वला योजनेच्या एलपीजी सिलिंडर वितरणातही अडचणी येत आहेत. तीन महिन्यांत मागण्या मान्य न झाल्यास दीर्घकाळ संपावर जाण्याचा इशारा संघटनेने पत्रात दिला आहे.
एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ
केंद्र सरकारने 7 एप्रिल रोजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली असून, त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत गॅस सिलिंडरची किंमत 803 रुपयांवरून 853 रुपयांवर पोहोचली आहे. कोलकाता येथे पेट्रोलचा दर 829 रुपयांवरून 879 रुपये, मुंबईत 802.50 रुपयांवरून 853.50 रुपये आणि चेन्नईत 818.50 रुपयांवरून 868.50 रुपये झाला आहे. तर दुसरीकडे उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.