Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात खळबळ ; पहाटे महिला डॉक्टरच्या घरात 35 वर्षीय डॉक्टरच शिरला अन् केलं भयंकर कृत्य

पुण्यात खळबळ ; पहाटे महिला डॉक्टरच्या घरात 35 वर्षीय डॉक्टरच शिरला अन् केलं भयंकर कृत्य
 

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात वारंवार अत्याचाराच्या घटना घडताना दिसत आहेत.अशातच आता पुन्हा एकदा पुणे शहर हादरलं आहे.एका पुरुष डॉक्टरने महिला डॉक्टरच्या घरात घुसून पहाटे विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.या प्रकरणी पीडित डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी डॉक्टर हे एकाच सोसायटीमध्ये राहतात.8 मे रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला डॉक्टर झोपेत असताना आरोपीने त्यांच्या घराची बेल वाजवली. दरवाजा उघडल्यानंतर आरोपीने जबरदस्तीने त्यांच्या घरात प्रवेश केला. त्याने फिर्यादीला ढकलून दिले व ती बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना तिला कानाखाली मारले. त्यानंतर तिचा हात पकडून जवळ ओढण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडित महिला डॉक्टर( वय 28 वर्ष) यांच्याकडून डॉक्टर विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
 
याप्रकरणी डॉ. दीपक बालाजी ढवळे (वय 35 वर्ष, रा. कदम हाइट्स, शिवशंभो नगर, भारती विद्यापीठ,) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक थोरात करत आहेत. आरोपी आणि फिर्यादी डॉक्टर यांच्यात पूर्वीपासून ओळख होती. ते एकाच इमारतीत राहतात. मात्र, असा प्रकार का घडला याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे

 

 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.