Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सरकारची सुपरहिट योजना, जमा करा फक्त 376 रुपये अन् मिळवा दरमहा 5 हजार

सरकारची सुपरहिट योजना, जमा करा फक्त 376 रुपये अन् मिळवा दरमहा 5 हजार
 

नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असतात. या योजनांचा फायदा देशातील लाखो लोकांना मिळत आहे. त्यापैकी केंद्र सरकारची एक योजना म्हणजे अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme). या योजनेत गुंतवणूकदारांना वयाच्या 60 व्या वर्षानंतर दरमहा 1 ते 5 हजारांची पेन्शन मिळू शकते. या योजनेत तुम्हाला दरमहा फक्त 376 रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे.

अटल पेन्शन योजना

केंद्र सरकारने देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी  यांच्या नावाने अटल पेन्शन योजना सुरु केली आहे. या योजनेत कोणताही भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतो. या योजनेत तुम्ही मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक आधारावर एक निश्चित रक्कम जमा करु शकतात आणि 60 वर्षांनंतर तुम्हाला 1 ते 5 हजार रुपयांदरम्यान पेन्शन मिळू शकते. 

या योजनेत तुम्ही 18 ते 40 वर्षे वयापर्यंत गुंतवणूक करू शकता मात्र हे लक्षात ठेवा की, तुम्हाला 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील वेगवेगळ्या पेन्शनसाठी वेगवेगळे मासिक प्रीमियम भरावे लागणार आहे. जर तुम्हाला 60 वर्षानंतर मासिक 5 हजार रुपये पेन्शन पाहिजे असेल तर तुम्हाला या योजनेत वयाच्या 25 वर्षी गुंतवणूकीला सुरुवात करावी लागेल. जर तुम्ही 25 व्या वर्षापासून या योजनेत दरमहा 376 रुपये जमा केले तर तुम्हाला 60 वर्षांनंतर दरमहा 5,000 रुपये पेन्शन सहज मिळेल. तुम्हाला 35 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. जे सुमारे 1,57,920 रुपये असेल. यानुसार दरमहा तुमच्या खात्यात 5 हजार रुपये येतील.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.