Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

छोट्या व्यापाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार देणार 5 लाखांची मर्यादा असलेले क्रेडिटकार्ड, असा करा अर्ज


छोट्या व्यापाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार देणार 5 लाखांची मर्यादा असलेले क्रेडिटकार्ड, असा करा अर्ज


छोट्या व्यावसायिकांसाठी एक मोठी बातमी आहे, केंद्र सरकार पाच लाख रुपयांपर्यंत मर्यादा असलेले क्रेडिट कार्ड देणार आहे. एमएसएमई अर्थात लघु, सूक्ष्म आणि मध्यम व्यवसायिकांसाठी ही योजना आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे एकप्रकारे छोट्या व्यावसायिकांना आपला व्यवसाय वाढवण्याची संधी मिळणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये (एमएसएमई) बळकटी देण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यात छोट्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वाढवण्याची कुटुंबाला सक्षम करण्यासाठी आणि एकप्रकारे बाजारपेठेतील व्यवहाराला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पैसा हा बाजारपेठेत खेळायला हवा, त्यातून अर्थव्यवस्थेलाही चालना मिळू शकेल अशी केंद्र सरकारची धारणा आणि योजना आहे.

या ध्येयपूर्तीसाठी प्रमुख गोष्ट म्हणजे सूक्ष्म उद्योगांसाठी क्रेडिट कार्ड योजना ही होय. यामुळे, लहान व्यावसायिकांना कागदपत्रांच्या अडचणीशिवाय सहजपणे कर्ज मिळू शकेल.

नवीन क्रेडिट कार्ड काय आहे?

केंद्र सरकार सूक्ष्म आणि लघू उद्योगांसाठी एक विशेष क्रेडिट कार्ड योजना सुरू करत आहे.
या योजनेद्वारे व्यावसायिक गरज पडल्यास त्यांना देण्यात येणाऱ्या क्रेडिटकार्डद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम घेऊ शकतील.
ही सुविधा केवळ सरकारी उद्योग पोर्टलवर नोंदणीकृत व्यापाऱ्यांसाठी आहे.
या योजनेच्या पहिल्या वर्षात सुमारे 10 लाख कार्ड जारी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे जेणेकरून जास्तीत जास्त लहान व्यावसायिकांना त्याचा फायदा घेता येईल.
क्रेडिट कार्ड कसे मिळू शकते?

जर तुम्हाला हे क्रेडिटकार्ड घ्यायचे असेल तर आधी तुम्ही लहान व्यापारी असणे आवश्यक आहे. तुम्ही जर लहान व्यापारी असाल आणि तुम्हाला सरकारच्या क्रेडिट कार्डचा लाभ घ्यायचा असेल तर प्रथम तुम्हाला उद्योग पोर्टलवर (msme.gov.in) नोंदणी करावी लागेल.

क्रेडिटकार्डसाठी नोंदणी कशी करायची?

प्रथम उद्यम पोर्टलवर जा, नंतर "क्विक लिंक्स" मध्ये दिलेल्या उद्यम नोंदणीवर क्लिक करा.
त्यानंतर आधार क्रमांक, पॅन कार्ड आणि व्यवसायाशी संबंधित माहिती यासारखी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
फॉर्म भरल्यानंतर, तो सबमिट करा.
काही काळानंतर तुम्हाला नोंदणी प्रमाणपत्र मिळेल.
नोंदणी पूर्ण झाल्यावर, तुम्हाला या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याचा पर्याय मिळेल.
या पर्यायावर जाऊन तुम्ही क्रेडिटकार्डसाठी नोंदणी करु शकता.

गॅरंटी कव्हर मर्यादा दुप्पट!

आता लहान व्यापाऱ्यांसाठी क्रेडिट गॅरंटी कव्हरची मर्यादा 5 कोटी रुपयांवरून 10 कोटी रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे बँका आणि वित्तीय संस्था लहान व्यावसायिकांना अधिक आत्मविश्वासाने कर्ज देऊ शकतील आणि जोखीम सरकार उचलेल. जर एखादा स्टार्टअप प्राधान्य क्षेत्रात काम करत असेल तर त्याला फक्त 1% दराने 20 कोटी रुपयांपर्यंतचे हमी कव्हर मिळेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.