Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम राष्ट्रांकडून पाकिस्तानला पाठिंबा; भारताविरोधात 57 देश एकवटले

पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम राष्ट्रांकडून पाकिस्तानला पाठिंबा; भारताविरोधात 57 देश एकवटले
 

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात २६ जणांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.  त्यात भारताकडून पाकिस्तानची विविध बाजूंनी नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी भारत तयार असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले असून त्यांनी आता मुस्लिम राष्ट्रांना पाठिंबा मागितला आहे. त्यामुळे आता पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देत भारताविरोधात 57 मुस्लिम देश एकवटले आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर आता 57 देशांची संघटना असलेल्या ओआयसी म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन या संस्थेने पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला आहे. या संघटनेला पाकिस्तानने नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतरच्या भारताच्या कृतींची माहिती दिली. त्यामुळे भारताची भूमिका अशियायी देशांमध्ये शांतता भंग करणारी असल्याचं म्हणत मुस्लिम राष्ट्रांना पाठिंबा मागितला आहे.

त्यानंतर ओआयसीच्या राजदूतांनी पाकिस्तान आणि त्यांच्या जनतेला पुर्ण पाठिंबा दिला. तसेच राजनैतिक संवादाद्वारे प्रादेशिक तणाव कमी करण्याचं अवाहन देखील ओआयसीच्या राजदूतांनी पाकिस्तानला केले आहे. दरम्यान यामध्ये जम्मू आणि काश्मिर प्रशअमावर देखील ओआयसीने शांततापूर्ण तोडग्यासाठी दिलेला प्रस्ताव तसेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव देखील पाकिस्तानने स्विकारला आहे.

दरम्यान दुसरीकडे अमेरिका देखील दोन्ही राष्ट्रांमध्ये समेट घडवण्याचे प्रयत्न करत आहेत. भारत पाकिस्तान संघर्षामध्ये अमेरिकेने भूमिका घेतली आहे. यावर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी सांगितलं की, अमेरिका दोन्ही बाजूशी सक्रिय संवाद साधत आहे. लवकरात लवकर आम्ही पाकिस्तान आणि भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलू. जगातील इतर नेते देखील यामध्ये लक्ष घालणार आहे. आम्हाला विश्वास आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वा मध्ये याचा सकारात्मक परिणाम होईल.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.