Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विवाह केला, कुटुंबापासून लपवले, संबंध ठेवले, लाखो उकळले; पोलीस उपनिरीक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल

विवाह केला, कुटुंबापासून लपवले, संबंध ठेवले, लाखो उकळले; पोलीस उपनिरीक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल
 

पुणे: जातीवाचक शिवीगाळ, तसेच बलात्कार व धमकावून गर्भपात करण्यास लावल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाविरूद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका २८ वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, विराज गावडे (वय ३२, रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा) असे पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून, त्याच्यासह भाऊ कुणाल, तसेच वडील गजानन यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विराज गावडे हा पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. २०२०मध्ये त्याची पीडित तरुणीशी ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. ही बाब त्याने कुटुंबीय, मित्रांपासून लपवून ठेवली. तेव्हा कुटुंबीयांना विवाहाबद्दलची माहिती देतो, असे सांगून विराज याने तरुणीकडून वेळोवेेळी १० ते १२ लाख रुपये घेतले. त्याने तरुणीशी संबंध ठेवले.

दरम्यान, विराज याची उपनिरीक्षकपदी निवड झाली. पीडित तरुणीने त्याच्याकडे विचारणा केली. कुटुंबीयांशी ओळख करून दे, तसेच विवाहाची माहिती त्यांना दे, अशी विनंती तिने केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. 'माझे कुटुंबीय माझ्यासाठी स्थळ पाहात आहेत. तू खालच्या जातीची आहेस. आपला विवाह कुटुंबीय मान्य करणार नाहीत. माझा विचार सोडून दे', असे त्याने तिला सांगितले. त्याने तरुणीला भेटण्यास टाळाटाळ सुरू केली. त्याचे वडील गजानन आणि भाऊ कुणाल यांनी त्याला साथ दिली. मला वडिलांच्या जागेवर चंद्रपूर येथे नोकरी मिळणार होती. विराजच्या सल्ल्यामुळे मी नोकरी नाकारली. आज मला नोकरीही नाही, तसेच विराजने माझी फसवणूक केली. मला धमकावून गर्भपात केला, असे पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस आयुक्त अनुजा देशमाने तपास करत आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.