Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: आता खासगी वाहनांना फटका बसणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: आता खासगी वाहनांना फटका बसणार
 

राज्यात वाहतूक कोंडी, वाढतं प्रदूषण आणि वाढत्या इंधनखर्चावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या नेतृत्वाखालील सरकारने खासगी कार पूलिंग सेवा अधिकृतपणे कायदेशीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी बाईक पूलिंगला मंजुरी  दिल्यानंतर आता कार पूलिंगलाही परवानगी देण्यात आली आहे. कार पूलिंग  म्हणजे एकाच मार्गावर जाणाऱ्या एकाहून अधिक व्यक्तींनी एकाच कारमध्ये प्रवास करणे. यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या कमी होते, इंधनाची बचत होते आणि प्रदूषणात घट येते. ही सेवा आता नोंदणीकृत अॅप किंवा वेब आधारित प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अधिकृतरित्या सुरू करता येणार आहे.

केंद्र सरकारच्या ग्रीगेटर निती 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अंतिम मंजुरी केंद्र शासनाच्या अख्त्यारीत येत असल्यामुळे त्यासाठी पुढील प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.  या निर्णयामुळे रिक्षा व टॅक्सी चालकांमध्ये नाराजी आहे. त्यांचं म्हणणं आहे की, कार पूलिंगमुळे त्यांचं उत्पन्न कमी होईल. प्रवाशांचा कल अॅप आधारित सुरक्षित, स्वस्त आणि सुलभ सेवेच्या दिशेने वाढत असल्यामुळे पारंपरिक सेवा व्यवसायांवर आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे. 
 
राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नियमावली आणि अटी लवकरच जाहीर केल्या जातील. या निर्णयामुळे मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक यांसारख्या जास्त मागणी असलेल्या मार्गांवर अॅपधारक कंपन्यांच्या अनियंत्रित सेवांवर चाप बसेल. कार पूलिंगच्या संचालनात सुसूत्रता, पारदर्शकता आणि नियंत्रण यासाठी यंत्रणा उभारण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.