उन्हाळा म्हणजे तापमानाचा कहर! त्यामुळे घरात AC किंवा कूलर चालू ठेवणं ही आता गरज बनली आहे. पण अनेकदा लोक एकाच गोंधळात अडकतात की AC लावताना पंखा सुरू ठेवावा का बंद करावा? काहीजण म्हणतात “हो, योग्य आहे” तर काही म्हणतात “नाही, योग्य नाही” मग नेमकं काय योग्य आहे?
तज्ज्ञांच्या मते : AC आणि पंखा दोघं एकत्र चालवल्यास उलट फायदा होतो. कारण AC मधून येणारी थंड हवा जड असते आणि ती सरळ खाली बसते. जर पंखा चालू असेल, तर ही थंड हवा खोलीभर सारखी पसरते. त्यामुळे थंडावा लवकर आणि सगळीकडे जाणवतो.
पंख्यामुळे तुम्हाला थोडक्याच तापमानातही थंड वाटतं. त्यामुळे तुम्ही AC १८-२० डिग्रीऐवजी २४-२५ डिग्रीवर ठेवू शकता. यामुळे AC ला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि त्याचा कंप्रेसर कमी वेळा सुरू होतो. याचा थेट परिणाम वीज वापरावर होतो. कूलर वापरत असाल, तरीही पंखा उपयोगी ठरतो. विशेषतः मोठ्या खोलीत, कूलरची हवा फक्त एकाच दिशेने जाते. पंख्यामुळे ही हवा खोलीत समान रीतीने फिरते. त्यामुळे कूलरची थंड हवा अधिक प्रभावीपणे पोहोचते आणि स्पीड वाढवण्याची गरज कमी होते. एसी किंवा कूलरसोबत पंख्याचा वापर केल्यास तुम्ही दर महिन्याला १० ते १५ टक्के वीज वाचवू शकता. एका अंदाजानुसार, हे दर महिन्याला सुमारे ५०० ते ८०० रुपयांपर्यंतची बचत करू शकते. वर्षभरात ही बचत हजारोंच्या घरात जाऊ शकते!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.