बँकेत खाते उघडताच तुम्हाला एटीएम कार्ड मिळतं. याला डेबिट कार्ड म्हणतात. याच्या मदतीने तुम्ही बँकेच्या कोणत्याही एटीएममधून पैसे काढू शकता, हे तुम्हाला माहिती असेल. आजच्या डिजिटल युगात लोकांनी रोख व्यवहार कमी करायला सुरुवात केलीय. तरीही एटीएमची गरज आजही आहे. एटीएमद्वारे व्यवहार करणे देखील सोपं झालंय. जर तुम्हाला काहीही खरेदी करायचे असेल तर ते एटीएमद्वारे सहज करता येते. एटीएममधूनही अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. पण आपल्याला त्याबद्दल माहिती नसल्याने त्याचा फायदा करुन घेता येत नाही. तुमच्याकडे एटीएम असेल तर कोणताही प्रीमियम न भरता विमा देखील उपलब्ध असतो. बँकांकडूनदेखील याबद्दल फारच कमी माहिती देण्यात येते.
बँकेकडून आपल्याला एटीएम कार्ड मिळत. त्याचप्रमाणे कार्डधारकांना अपघाती विमा आणि अकाली मृत्यू विमा मिळतो. डेबिट/एटीएम कार्डवर देखील जीवन विमा संरक्षण मिळते, हे बहुतेक लोकांना माहिती नसते. वैयक्तिक अपघाती विमा (मृत्यू) नॉन-एअर विमा डेबिट कार्ड धारकाला अकाली मृत्यूविरुद्ध विमा दिला जातो, अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर देण्यात आलीय.
एटीएम कार्डवर मोफत विमा रक्कम
जर तुम्ही कोणत्याही बँकेचे एटीएम कार्ड 45 दिवसांपेक्षा जास्त काळ वापरले असेल तर तुम्ही मोफत विमा सुविधेचा लाभ घेऊ शकता. यामध्ये अपघात विमा आणि जीवन विमा दोन्हीचा समावेश असतो. आता तुम्ही या दोन्ही परिस्थितींमध्ये विम्याचा दावा करू शकता. यात कार्डच्या श्रेणीनुसार रक्कम निश्चित करण्यात आलेली असते. एसबीआय त्यांच्या गोल्ड एटीएम कार्ड धारकांना 4 लाख रुपयांचे (हवाई मृत्यू) आणि 2 लाख रुपयांचे (हवाई नसताना) कव्हर देते. तर प्रीमियम कार्ड कार्डधारकाला 10 लाख रुपये (हवाई मृत्यू) आणि 5 लाख रुपये (हवाई नसताना) चे कव्हर देते. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा बँक यासह अनेक बँका त्यांच्या डेबिट कार्डवर वेगवेगळ्या रकमेचे कव्हर देतात. काही डेबिट कार्ड 3 कोटी रुपयांपर्यंत मोफत अपघाती विमा संरक्षण देतात. हे विमा संरक्षण मोफत दिले जाते. यामध्ये बँकेकडून कोणतेही अतिरिक्त कागदपत्रे मागितली जात नाहीत.
डेबिट कार्ड व्यवहार आवश्यक
डेबिट कार्डद्वारे काही व्यवहार विशिष्ट कालावधीत केले असतील तर विम्याचा फायदा तेव्हाच मिळतो. वेगवेगळ्या कार्डांसाठी हा कालावधी वेगवेगळा असू शकतो. तुमच्या एटीएम कार्ड्सवर तुम्हाला विमा पॉलिसी सक्रिय करायची असेल तर कार्डधारकाला दर 30 दिवसांनी किमान एकदा व्यवहार करणे आवश्यक आहे. काही कार्डधारकांना विमा संरक्षण अॅक्टीव्ह करण्यासाठी गेल्या 90 दिवसांत एकदा व्यवहार करणे आवश्यक आहे.
नॉमिनीला मिळते दाव्याची रक्कम
प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यांवर जारी केलेल्या रुपे कार्डवर ग्राहकांना 1 ते 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देखील मिळते. जर डेबिट कार्डधारकाचा अपघातात मृत्यू झाला तर त्याचा नॉमिनी संबंधित बँकेत जाऊन विम्याचा दावा करू शकतो.
दावा कसा करायचा?
जर एखाद्या एटीएम कार्डधारकाचा अपघातात मृत्यू झाला, तर काय करायच? जाणून घेऊया. ज्या कार्डधारकाचा मृत्यू झालाय त्याच्या नॉमिनीला संबंधित बँकेच्या शाखेत जावे लागते. तिथे गेल्यानंतर तुम्हाला भरपाईसाठी अर्ज सादर करावा लागेल. यासोबतच आवश्यक कागदपत्रे बँकेत सादर करावी लागतील. काही दिवसांनी नॉमिनीला विमा दावा मिळतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.