Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रवादी तर्फे नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार...

राष्ट्रवादी तर्फे नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार...
 

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी प्राध्यापिका सौ. साधना कांबळे-धेंडे यांची तर प्रदेश संघटक सचिव पदी माजी नगरसेविका सौ.सुवर्णा पाटील यांची निवड झाली आहे. शहरजिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे व जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील यांच्या शिफारशीनुसार प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते निवड करण्यात आली. त्याबद्दल आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

सौ.साधना कांबळे या प्राध्यापिका असून त्या कवठेमहांकाळ नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा आहेत. तसेच सौ.सुवर्णा पाटील या सांगली महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिला आघाडीची बांधणी आता तालुकवार तर होत जाईलच शिवाय शहरातील प्रभाग निहाय देखील होणार आहे असा ठाम विश्वास पद्माकर जगदाळे व प्रताप पाटील यांनी व्यक्त केला. त्यामुळे आमचे नेते व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील राष्ट्रवादी अधिकाधिक भक्कम होत जाईल अशी खात्री आहे.
 
यावेळी पक्षाचे नेते मुन्ना कुरणे, कडेगाव तालुका अध्यक्ष कृष्णात मोकळे, महिला अध्यक्षा राधिका हारगे, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष तोहीद शेख, युवक अध्यक्ष चंद्रकांत पाटील, किसन सेल प्रदेश उपाध्यक्ष इम्रान तहसीलदार, युवक जिल्हा संघटक शुभम पाटील, युवकचे सांगली शहर कार्याध्यक्ष ज्ञानेश पाटील, कुपवाड अध्यक्ष आशितोष धोत्रे, कुपवाड युवक अध्यक्ष दादासो कोळेकर, पक्षाचे जिल्हा सचिव दिपक मगदूम, महेश साळुंखे आदींसह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.