धक्कादायक ! एकाच कुटुंबातील ७ जणांनी जीवन संपविले; कारच्या काचा बंद केल्या अन्...
हरियाणातील पंचकुला येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. पीडित कुटुंबातील लोक डेहराडूनचे रहिवासी होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील ७ जणांनी कारमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. पंचकुला येथील सेक्टर २७ मधील एका घराबाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये या सर्वांचे मृतदेह बंद अवस्थेत आढळले. कुटुंबातील सदस्य कर्जबाजारी होते आणि आर्थिक संकटाचा सामना करत होते असे सांगितले जात आहे.
मूळ उत्तराखंडचे रहिवासी असलेले हे जोडपे, त्यांची तीन मुले आणि दोन वृद्धांनी संशयास्पद परिस्थितीत विष प्राशन केले. सातही जणांना सेक्टर २६ मधील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे एक जण वगळता सर्वांना मृत घोषित करण्यात आले. जो वाचला तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मरण पावला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री १२.१५ वाजता सेक्टर २७ मधील एका रिकाम्या भूखंडासमोर उभ्या असलेल्या कारमध्ये प्रवीण मित्तल (४२), त्यांची पत्नी, तीन मुले (एक मुलगा आणि दोन मुली) आणि प्रवीणचे वृद्ध आई-वडील संशयास्पद स्थितीत आढळले. रस्त्याने जाणाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, रुग्णवाहिका बोलावली आणि सातही जणांना सेक्टर २६ मधील एका खाजगी रुग्णालयात नेले.
तिथे प्रवीण वगळता कुटुंबातील इतर सर्व सदस्यांना मृत घोषित करण्यात आले. प्रवीणची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सेक्टर ६ मधील सरकारी रुग्णालयात रेफर करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. तपासादरम्यान, पोलिसांना कारमधून मुलांच्या शाळेचे दफ्तर, खाद्यपदार्थ, कपडे आणि इतर वस्तू सापडल्या.
कर्जाच्या बोजामुळे टोकाचे पाऊल
हे कुटुंब पंचकुला येथे भाड्याच्या घरात राहत होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबाच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की प्रवीण मित्तल यांचे कुटुंब खूप कर्जात बुडाले होते. काही काळापूर्वी त्याने देहरादूनमध्ये टूर अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला. त्यातही त्याला अपयश आले. कर्जाच्या बोजामुळे कुटुंबाने एवढे मोठे पाऊल उचलले. दरम्यान, डीसीपी हिमाद्री कौशिक म्हणाले की, परिस्थिती अद्याप पूर्णपणे स्पष्ट नाही. पोलिस पथक तपास करत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.