Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोव्यात परिचारिकेवर बलात्कार; मिरजेतील डॉक्टरला अटक

गोव्यात परिचारिकेवर बलात्कार; मिरजेतील डॉक्टरला अटक


मिरज : परिचारिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी मिरजेतील डॉ. सुयोग ऊर्फ बॉबी आरवट्टगी (वय 40, रा. मिरज) याला गोव्यातील कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली असून, डॉ. आरवट्टगी याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

डॉ. सुयोग हा गोव्यात कुंकळ्ळी येथे वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. एक महिन्यापूर्वी संबंधित डॉक्टरने त्याच्या खासगी रुग्णालयात काम करणार्‍या परिचारिकेस रुग्णाच्या तपासणीच्या बहाण्याने त्याच्या निवासस्थानी नेले. यावेळी डॉ. आरवट्टगी याने या परिचारिकेवर बलात्कार केल्याची तक्रार आहे. या घटनेनंतर पीडित परिचारिकेने गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दिली.

याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तीन दिवस पोलिस कोठडी दिल्यानंतर न्यायालयाने डॉ. आरवट्टगी याला 14 दिवस न्यायालयीन कोठडी दिल्याने त्याची रवानगी कोलवाळ कारागृहात करण्यात आली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.