इस्लामाबाद :- भारत आणि पाकिस्तान यांच्यात 10 मे रोजी झालेल्या शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी पुन्हा एकदा भारताविरोधात वादग्रस्त वक्तव्य करताना दिसला आहे. कराचीत काढलेल्या रॅलीदरम्यान आफ्रिदीने आरोप केला की, "पाकिस्तानची प्रगती भारतामुळे थांबते आहे." याशिवाय त्याने नरेंद्र मोदींवरही टीका करत म्हटलं, "मोदींना आता कळालं असेल, पाकिस्तानसोबत युद्ध करणं किती महागात पडतं."
शाहीद आफ्रिदीच्या म्हणण्यानुसार, "भारत प्रगती करत आहे, त्यात काही वावगं नाही. पण पाकिस्तानला प्रगती करू देत नाही. शेजारी म्हणून ही जबाबदारी भारताची आहे का?" अशा शब्दांत त्याने भारतावर आरोप केला. याशिवाय आफ्रिदीने आपल्या जुन्या भूमिकेला अनुसरून भारतीय पंतप्रधानांवर आणि सशस्त्र दलांवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्याने यापूर्वीही भारतीय सैन्यावर वादग्रस्त आरोप केले होते, विशेषतः पहलगाम हल्ल्यानंतर.आफ्रिदीचा चुलत भाऊ शाकिब हरकत उल अंसार हा दहशतवादी संघटनेचा कमांडर होता आणि 2003 मध्ये अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत ठार झाला होता. त्यावेळी BSF ला मिळालेल्या पुराव्यांवरून हे सिद्ध झाले होते. तरी आफ्रिदीने ही बाब नाकारली होती. शाहीद आफ्रिदीच्या या वक्तव्यांमुळे भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.