पुणे: पुण्यात तरुणी व महिलांवर होत असलेल्या अत्याचाराची मालिका सध्या सुरूच आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, खेड तालुक्यात 27 वर्षीय तरुणीवर नाईट शिफ्टला जातांना एका अज्ञाताने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना मेदनकरवाडी परिसरात घडली आहे.
माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास तरुणी नाईट शिफ्ट असल्यामुळे कंपनीत जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान, तरुणीला एकटी पाहून एका नराधमाने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. निर्जन स्थळ आणि अंधार असल्याने नराधमाने तरुणीला रस्त्यात अडवले पीडितेला धमकी देऊन मारहाण करून जबरदस्तीने अंधारात परिसरातील शाळेच्या मागे फरपटत नेत बलात्कार केला. पीडित तरुणीने आरडाओरड केली, आरोपीचा चावा घेत स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती तिची सुटका करू शकली नाही. निर्जन स्थळ असल्याने तिच्या मदतीसाठीही कोणीही आले नाही.
अत्याचारानंतर तिने कंपनीत जाणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी तरुणीची मदत केली व पोलिसांना फोन लावला. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आरोपीचा शोध घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या सहकार्याने सहा विशेष पथके स्थापन करून सीसीटीव्ही फुटेज तपास करत आरोपीचा शोध घेतला. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करून आरोपीला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव प्रकाश तुकाराम भांगरे असल्याचे समोर आले आहे. घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील असून सध्या खेड येथे वास्तव्यास आहे. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान, पोलिस सध्या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.