कोल्हापूर : शहरातील मध्यवर्ती करवीर निवासिनी यात्री निवासमध्ये चालणार्या वेश्या अड्ड्यावर अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांच्या पथकाने मंगळवारी छापा टाकून मॅनेजरला अटक केली. शरीरविक्रय करणार्या सहा परप्रांतीय महिलांची सुटका केली. मॅनेजर विकास दत्तात्रय पाटील (वय 28,
रा. गोकुळ शिरगाव, ता. करवीर) याला अटक केली आहे. यात्री निवासचा चालक
इंद्रजित ऊर्फ बबलू सत्यजित गायकवाड (रा. फुलेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल
केला. बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील या यात्री निवासमध्ये वेश्याअड्डा
सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार
बच्चू यांनी चारही पोलिस ठाण्यांतर्गत विशेष पथकाची त्यांनी नियुक्ती केली.
मंगळवारी सायंकाळी छापा टाकला.
शरीरविक्रयासाठी आलेल्या या महिला पश्चिम बंगाल आणि दिल्ली येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. चार महिन्यांपासून कुंटणखाना सुरू असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. चालक इंद्रजित ऊर्फ बबलू गायकवाड याचा शोध सुरू आहे. याच यात्री निवासमधील वेश्या अड्ड्यावर पोलिसांनी जानेवारी 2024 मध्ये कारवाई केली होती. शहरातील मध्यवर्ती परिसरातील यात्री निवासात सुरू असलेल्या वेश्या अड्ड्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. संशयितावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.