न्यायालयाला रस्ते अपघात प्रकरणी सुनावणी सुरु होती. या प्रकरणी न्यायाधीश निकाल देण्यास तयार असतानाच, अचानक न्यायालयातील स्टेनोग्राफरने जीवन संपविण्याची धमकी दिली. ताे न्यायालयातून बाहेर पडला. अचानक
घडलेल्या प्रकाराने न्यायाधीशांनसह उपस्थित हादरले. न्यायाधीशांनी
निकाल स्थगित ठेवला. न्यायालयातील कर्मचार्यामुळे निकालच स्थगित ठेवावा
लागल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीतील करकडडूमा न्यायालयात घडला.
काय होते प्रकरण ?
'बार अँड बेंच'च्या रिपोर्टनुसार, १३ वर्षांपूर्वी, ९ मे २०१२ रोजी, दिल्लीतील गीता कॉलनीजवळ सुखदेव नावाच्या एका व्यक्तीने मोटारसायकलला ट्रकला धडक दिली होती. या अपघातात मोटारसायकलस्वार आकाश कश्यप याचा मृत्यू झाला. हा खटला १० वर्षांहून अधिक काळ न्यायालयात चालला. अपघाताचे फोटो न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायाधीशांनी पाहिले की ट्रकचा पुढचा भाग आणि दुचाकीचा मागचा भाग खराब झाला होता. ट्रकने दुचाकीला धडक दिल्याचे सिद्ध झाले. करकडडूमा न्यायालयाच्या निकालाकडे मृताच्या कुटुंबीयांचे लक्ष वेधले होते.केवळ 'ब्रेथ अनालायझर'' चाचणी दारू पिल्याचा ठोस पुरावा नाही : उच्च न्यायालय न्यायाधीशांना निकाल ठेवावा लागला स्थगित २९ एप्रिल रोजी, न्यायाधीश नेहा गर्ग निकाल देणार असताना, तिचा स्टेनोग्राफर आत्महत्या करणार असल्याचे सांगून कोर्टातून निघून गेला. यामुळे तिथे उपस्थित असलेले लोक स्तब्ध झाले. न्यायाधीशांनी निकाल जाहीर करणे स्थगित केले. न्यायाधीश न्यायाधीश नेहा गर्ग यांनी आपल्या आदेशात म्हटलं की, न्यायालयाचे नियमित स्टेनोग्राफर जीवन संपविण्याचे धमकी देऊन न्यायालयातून निघून गेले. त्यामुळे निकाल देता येणार नाही. तसेच त्यांनी ०९ मे २०२५ रोजी दुपारी २:०० वाजता निकाल जाहीर करण्यासाठी ते पुन्हा सूचीबद्ध केले.
न्यायालयाने आरोपीला ठरवले दोषी
या प्रकरणी न्यायालयाची सुनावणी शुक्रवार, ९ मे रोजी पुन्हा सुरू झाली. पोलिस आणि साक्षीदारांचे जबाब विचारात घेण्यात आले आणि करकडडूमा न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी नेहा गर्ग यांनी आरोपी सुखदेवला दोषी घोषित केले.न्यायालयाने आरोपींना भारतीय दंड संहिता १८६० (आयपीसी) च्या कलम २७९ (सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवणे) आणि ३०४ अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवणे) अंतर्गत दोषी ठरवले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.