पिंपरी चिंचवडच्या रस्त्यावर मध्यरात्री तरूणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वालेकर वाडी येथे १८ वर्षांच्या तरूची धारधार शस्त्राने सपासप वार करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रसंगाचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेय. पोलिसांकडून तात्काळ या प्रकाराचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पिंपरी चिंचवड शहरातील वालेकर वाडी येथे एका अठरा वर्षे तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. वालेकरवाडी येथील कृष्णाई नगरमध्ये रविवारी रात्री साडेनऊ वाजता दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत कोमल भरत जाधव या 18 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दुचाकी वाहनावर हेल्मेट घालून आलेल्या दोन आरोपींनी कोमल भरत जाधव हिच्यावर भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करत खून केला आहे. तरुणीचा खून करण्यासाठी आलेले दोन्ही आरोपी दुचाकीवरून कृष्णाई नगर परिसरात फिरतानाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. पोलिसांकडून अज्ञात मारेकाराचा शोध घेतल जात आहे.रात्री साडेनऊ वाजताच्या भर चौकात १८ वर्षीय तरूणीची हत्या करण्यात आल्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांकडून तपास केला जातोय. पण हत्या का करण्यात आली? याचा शोध पोलीस घेत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.