Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खुशखबर! व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये नव्या फीचरची एंट्री; आहे खूपच फायद्याचं, पटकन पाहा एका क्लिकवर

खुशखबर! व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये नव्या फीचरची एंट्री; आहे खूपच फायद्याचं, पटकन पाहा एका क्लिकवर
 

जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा एकदा आपल्या युजर्ससाठी एक नवी आणि उपयुक्त सुविधा घेऊन येत आहे. आता वापरकर्ते इतरांच्या स्टेटस अपडेट्स सहजपणे फॉरवर्ड आणि रिशेअर करू शकणार आहेत. मात्र या सुविधेसोबतच, कोण तुमचे स्टेटस शेअर करू शकते हे ठरवण्याचा अंतिम अधिकारही तुमच्याकडेच असेल. हे नवे फीचर सध्या बीटा व्हर्जनमध्ये अँड्रॉइड युजर्ससाठी चाचणीच्या टप्प्यात आहे. लोकप्रिय वेबसाइट WABetaInfo ने या नव्या फिचरची माहिती आपल्या X (पूर्वीचे Twitter) हँडलवर शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये याचे स्पष्ट संकेत दिले आहेत की, आता युजर्सना स्टेटसच्या शेअर्सवर अधिक नियंत्रण मिळणार आहे.


जर एखाद्याला तुमचे स्टेटस आवडले आणि त्याला ते शेअर करायचे असेल, तर आता तो ते सहज करू शकेल पण फक्त तुम्ही परवानगी दिल्यासच! एक "टॉगल" (स्विच) देण्यात येणार असून, त्याद्वारे वापरकर्ता ठरवू शकतो की त्याचे स्टेटस इतरांनी शेअर करावे की नाही.
 
संगीत आणि शेअरिंग

याआधी व्हॉट्सअ‍ॅपने स्टेटसमध्ये म्युझिक घालण्याची सुविधा सुरू केली होती, ज्याने युजर्समध्ये बऱ्यापैकी उत्साह निर्माण केला होता. आता ही नवी 'स्टेटस शेअरिंग' सुविधा सुरू झाल्यास, अनेक युजर्सना आपले विचार, फोटो किंवा माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग खुला होणार आहे.


पर्सनल 'चॅट बॅकग्राउंड'
इतक्यावरच न थांबता, व्हॉट्सअ‍ॅप अजून एक नवी सुविधा आणण्याच्या तयारीत आहे. Meta AI च्या मदतीने, वापरकर्ते स्वतःचे खास चॅट बॅकग्राउंड डिझाईन करू शकणार आहेत. ही सुविधा अजून विकसित होत आहे, पण लवकरच सर्व युजर्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅपचे जगभरात ३.५ अब्जहून अधिक वापरकर्ते आहेत. याचे कारण म्हणजे अ‍ॅपचे सोपे इंटरफेस, मजबूत सुरक्षा सुविधा आणि सातत्याने होणारे नविन अपडेट्स. स्टेटस शेअरिंगसारख्या सुविधेमुळे वापरकर्त्यांचा अनुभव आणखी सोपे व मजेशीर होणार आहे. नवीन स्टेटस फीचर कधीपासून उपलब्ध होईल याबाबत अद्याप कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, बीटा युजर्सकडून मिळत असलेल्या प्रतिक्रियांवरून हे फीचर लवकरच सर्वसामान्य युजर्ससाठीही सुरू होण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ते आता इतरांचे स्टेटस शेअर करू शकतील.

स्टेटस शेअर होईल की नाही हे वापरकर्ता ठरवू शकतो.

ही सुविधा सध्या बीटा चाचणीमध्ये आहे.

Meta AI च्या मदतीने वैयक्तिक चॅट बॅकग्राउंडही लवकरच येणार.





➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.