Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- अलमट्टी धरणांच्या उंची विरोधात सांगलीत खासदार विशाल पाटील आक्रमक

सांगली :- अलमट्टी धरणांच्या उंची विरोधात सांगलीत खासदार विशाल पाटील आक्रमक
 

अलमट्टी धरणाच्या ऊंची वाढी विरोधात खासदार विशाल पाटील आक्रमक झालेले आहेत. आज सांगलीमध्ये चक्काजाम आंदोलन करून अलमट्टी धरणाच्या ऊंची वाढीच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे कर्नाटकच्या अलमट्टी धरणाच्या ऊंचीवाढीचा मुद्दा आता तापलेला बघायला मिळत आहे. सांगलीत पार पडलेल्या विविध संघटनांच्या बैठकीत या चक्काजाम आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आज ही आंदोलन करण्यात आले.


अलमट्टी धरणाची ऊंची वाढवण्यास येथील नागरिकांचा विरोध आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज अंकली टोल नाक्यावर हा चक्काजाम केलाआहे. यावेळी खासदार विशाल पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला बघायला मिळाला. या आंदोलनाला विविध संघटनांबरोबरच सांगलीतील नागरिकांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ऊंची वाढवून कोल्हापूर आणि सांगलीतील नदीकाठच्या लोकांना घाबरवलं जात आहे, असा या आंदोलकांचा आरोप आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.