मिरजेच्या पडून असलेल्या शासकीय दुग्धालयाच्या जागेवर शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मिरज हे मेडिकल हब आहे. मिरज येथे शासकीय रुग्णालयासह खाजगी अनेक रुग्णालय आहेत. मिरज येथे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना आहे. त्यामुळे या ठिकाणी शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय होऊ शकते. शासकीय दूध डेअरी ची सुमारे 50 एकर इतकी जागा आहे. त्या जागेमध्ये शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय उभे राहू शकते. हे शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी मंजुरी मिळावी. समीत कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनाचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यास सकारात्मक विचार करू, असे आश्वासन दिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.