Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बनावट कागदपत्रावरून ट्रस्टच्या नावे बँकांत खाते काढून सट्ट्याचे सव्वातीन काेटी ठेवले:, सांगलीतील 2 जणांविरोधात गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रावरून ट्रस्टच्या नावे बँकांत खाते काढून सट्ट्याचे सव्वातीन काेटी ठेवले:, सांगलीतील 2 जणांविरोधात गुन्हा दाखल
 

धाराशिव : बनावट कागदपत्राच्या आधारे येथील ह्युमन हेल्थ केअर रिर्सोसेस चॅरिटेबल ट्रस्टच्या नावे दोन बँकांमध्ये खाते काढून सट्ट्याचे तब्बल तीन कोटी ३५ लाख रुपये ठेवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.२७) उघडकीस आला. या प्रकरणी ट्रस्टच्या उपाध्यक्षांनी दिलेल्या फिर्यादीवरून हैदराबाद व सांगली येथील दाेघांविरुद्ध धाराशिव शहर ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

हैदराबाद येथील आरोपी असद खान मुस्ताफा खान पठाण व सांगली येथील रुपेश सावरदेकर यांनी ७ जानेवारी ते १४ मार्च २०२५ या कालावधीत ह्युमन हेल्थ केअर रिर्सोसेस चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष सलमान इकबाल पठाण (रा. गणेशनगर, धाराशिव) व इतर सदस्य यांच्या नावे बनावट नोटरी तयार करून उपाध्यक्षासह इतर पाच सदस्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या तसेच अंगठे नोटरीवर घेतले. यानंतर महाराष्ट्र बँक शाखा, काळा मारुती चौक, धाराशिव व बँक ऑफ इंडिया शाखा, बार्शी नाका, धाराशिव येथे दाेन स्वतंत्र खाती उघडली.
 
या खात्यांवर सांगली येथील आरोपी रुपेश सावरदेकर याने क्रिकेट सट्टा (आयपीएल क्रिकेट मॅच) किंवा ऑनलाइन गेम सट्टा नावाची ३ कोटी ३५ लाख ९८ हजार २९२ रुपये एवढी रक्कम फिर्यादीच्या संमतीशिवाय वापरून फसवणूक केली. हा धक्कादायक प्रकार समाेर आल्यानंतर ट्रस्टचे उपाध्यक्ष सलमान पठाण यांनी २७ मे रोजी धाराशिव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून उपराेक्त दाेघा आराेपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.