पोलीस उपनिरीक्षकपदाची निवड यादी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक या पदाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यामध्ये अतिश मोरे या उमेदवाराने सर्वाधिक गुणांसह राज्यात प्रथम अव्वल क्रमांक पटकावला आहे.
आयोगाने पीएसआय संवर्गातील ३७४ पदांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी परीक्षा घेण्यात आली होती. गेल्या दीड वर्षापासून उमेदवारांना या निकालाची प्रतीक्षा होती. अखेर आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. ही गुणवत्ता यादी उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने तयार करण्यात आली आहे. यामध्ये काही दावे खोटे निघाल्यास उमेदवाराची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाऊ शकते, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध केल्यानंतर अपात्र उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय सादर करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात येतो. त्याप्रमाणे महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरिता ६ ते १२ मे २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.