ट्रम्प यांच्या विरोधात पोस्ट, कंगना अडचणीत; जेपी नड्डांचा फोन येताच 'ट्विट केलं डिलीट', पण स्क्रीनशॉट व्हायरल.
दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री आणि मंडी संसदीय मतदारसंघातील भाजप खासदार कंगना राणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यांनी त्यांच्या 'X' या सोशल मीडिया हँडलवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात पोस्ट केली होती. त्यांनी भारतात अॅपल फोनच्या निर्मितीबाबत ट्रम्प यांनी दिलेल्या विधानावर टीका केली होती. तसे यांच्यापेक्षा मोदीच भारी असल्याचं अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी म्हटलं होतं.
मला अॅपल फोन भारतात बनवायचे नाहीत. मी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना सांगितले आहे की उत्पादन अमेरिकेत झाले पाहिजे, असं ट्रम्प यांनी गुरुवारी म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना कंगनाने एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने ट्रम्प यांचे विचार बेजबाबदार आणि मर्यादित दृष्टिकोन असल्याचे म्हटले. ही पोस्ट प्रसारित झाल्यानंतर, भाजपा पक्षाच्या अध्यक्षांच्या सूचनेवरुन कंगनाने आपले ट्विट डिलिट केलं आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कंगनाला वैयक्तिकरित्या फोन केला आणि स्पष्ट केले की खासदार आणि पक्षाची प्रतिनिधी म्हणून तिने आंतरराष्ट्रीय नेत्यांवर सार्वजनिकपणे भाष्य करणे टाळावे. ‘माझे जे वैयक्तिक मत मी व्यक्त केलं होतं, त्याबद्दल मला खेद आहे. दरम्यान, वरिष्ठांच्या सूचनांनुसार मी माझे मत लगेच ट्विटर आणि इंस्टाग्रामवरून देखील हटवले आहे. धन्यवाद..’ असे कंगना रणौतने म्हटले आहे. दरम्यान, कंगना रणौत अभिनेत्री आणि खासदार देखील आहेत.
कंगनाचं ट्विट काय होत?
हे प्रेम कमी होण्याचं काय कारण असू शकतं?ते अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, पण जगातील सर्वात लोकप्रिय नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.ट्रम्प यांची ही दुसरी टर्म आहे, तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान आहेत.ट्रम्प जरी लिजेंड असले तरी नरेंद्र मोदी हे लिजेंडचे बाप आहेत, यात शंकाच नाहीतुम्हाला काय वाटत?ही तुमची जळाऊ वृत्ती आहे की, डिप्लोमॅटीक असुरक्षितता?असा सवाल कंगनाने ट्विटमधून विचारला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.