Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- 'वालचंद'च्या जयला दीड कोटींचे पॅकेज; अमेरिकेच्या रुबरिक कंपनीकडून महाविद्यालयाच्या इतिहासातील उच्चांकी वार्षिक वेतन

सांगली :- 'वालचंद'च्या जयला दीड कोटींचे पॅकेज; अमेरिकेच्या रुबरिक कंपनीकडून महाविद्यालयाच्या इतिहासातील उच्चांकी वार्षिक वेतन
 

सांगली : येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील   जय शिरगुप्पे या विद्यार्थ्याला डाटा सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या अमेरिकेतील बहुराष्ट्रीय रुबरिक कंपनीने  तब्बल दीड कोटींचे वार्षिक पॅकेज देऊ केले आहे. महाविद्यालयाच्या इतिहासातील हे उच्चांकी पॅकेज आहे. कँपस मुलाखतीतून महाविद्यालयातील ८४ टक्के विद्यार्थ्यांना सरासरी दहा लाखांहून अधिक रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. आज महाविद्यालयाचा स्वायत्तता प्राप्त झाल्यानंतरचा १५ वा प्रारंभ दिन समारंभ होत आहे.

यंदाच्या २०२४-२५ या शैक्षिणक वर्षात महाविद्यालयाच्या कार्पोरेट रिलेशन, माजी विद्यार्थी व विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने वर्षभरात ११६ कंपन्यांनी कॅम्पस मुलाखती घेतल्या. त्यात गुगल, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, क्रेड, केडन्स, ॲप्लाईड मटेरियल, युनायटेड बॅंक ऑफ स्वित्झरलँड, स्नायडर, इटॉन इंटरनॅशनल, सीमेन्स, फिलिप्स, ओरॅकल, हनिवेल ऑटोमेशन, महानगर गॅस, टीसीएस, टाटा पॉवर, एलअँडटी, अदानी, रिलायन्स, टाटा ग्रुप ऑफ कंपनीज, बॉश, कॅप जेमिनी, ॲटलॉस, हिंदुस्थान युनिलिव्हर, कमिन्स, जेकब्ज, रेक्सल इंडिया आदी कंपन्यांनी सहभाग घेतला.

कंपनीनिहाय विद्यार्थी व कंसात त्यांना मिळालेले वार्षिक वेतन : गुगल ः यशस्वी पाटील, अंकिता डोंगरे, साक्षी धामापूरकर (प्रत्येकी ५४ लाख), मायक्रोसॉफ्ट ः वैष्णवी लोखंडे (५२.५), क्रेड ः आराध्य पित्तलवार, प्रज्वल शहा (५२), ॲडोबी ः कृणाल गिराडकर (४८), ॲमेझान ः रिद्धी शहा, हरिश्री वैद्य, नंदिनी गिते, सानिका पाटील, सृजन मुजावर, ऋतुजा मदने (प्रत्येकी ४२ लाख), वेफेअर ः श्रावणी उमरे, ज्योतिरादित्य पाटील, तुषार राठोड (२५), क्वाईन स्वीच ः पंकज भोसले, हर्ष कारवा (२५), डेल ः स्वप्नील खोत (२१). 
 
डॉईश बॅंक ः मधुसूदन काबरा, सौरभ राजोपाध्ये, दत्ता गांगजी, मनीष बर्गे, सोहम अध्यापक, विराज पाटील (२०.५), ॲप्लाईड मटेरियल ः नीरज पात्रडकर, सुदर्शन लबडे (२०), ध्रुवा सॉफ्टवेअर ः स्मित बुटाले (१७.५), टॉम टॉम इंटरनॅशनल ः विश्‍वास नलावडे (१५.७), युनायटेड बॅंक ऑफ स्वित्झरलॅंड ः शुभम पाटील, अभिषेक लहासे, आदित्य पाटील, अंशुल गीड, आशिष सुतार, हिमांशू मुडे, कैलास पाटील, प्रथमेश बसापुरे, राहुल रेवाण्णा, सानिका मांडरे, श्रेयस नरुले, श्रीया पाटील, सिध्दांत शिंदे, विराज टाकुणे (१४.५). याशिवाय अन्य विद्यार्थ्यांनी केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्येही यश मिळवले आहे.



मराठीतून प्राथमिक शिक्षण

सर्वाधिक उच्चांकी वेतन मिळालेल्या जय शिरगुप्पे याचे प्राथमिक शिक्षण सांगलीतील विश्रामबाग येथील सावरकर प्रशालेत, तसेच पुण्यातील प्रियदर्शिनी विद्यालय आणि पन्हाळा पब्लिक स्कूल येथे मराठी आणि इंग्रजी माध्यमातून झाले आहे. आई सुनीता गृहिणी तर वडील नितीन केएसबी पंपस् येथे अभियंता म्हणून कार्यरत आहेत. तो 'वालचंद'च्या २०२४-२५ मधील संगणक शाखेचा विद्यार्थी आहे. रुबरिक कंपनीने त्याला महाविद्यालयात शिकत असतानाच दरमहा १.७५ हजार रुपयांचे विद्यावेतन दिले होते. डेटा सुरक्षा विद्याशाखेत त्याचे संशोधन सुरू आहे.

देशव्यापी योगदान
स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या वालचंद महाविद्यालयाने देशउभारणीत अविरत योगदान दिले आहे. महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष अजित गुलाबचंद, सदस्य चकोर गांधी, अमोल चव्हाण, माजी खासदार संजय पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास पाटील, दीपक शिंदे-म्हैसाळकर यांचे प्रोत्साहन मिळत आहे. महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ. उदय दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय हा देशभरात लौकिक कायम ठेवला आहे.

माहिती-तंत्रज्ञान, बांधकाम, ऊर्जा, वाहन, अपारंपरिक उर्जा अशा विविध क्षेत्रांतील ११६ कंपन्यांनी यावर्षी कॅम्पस मुलाखतींसाठी उपस्थिती लावली. त्यात सहभागी ४१२ जणांपैकी ३५१ जणांना आजपर्यंत नोकरी मिळाली आहे. सरासरी साडेदहा लाखांचे वार्षिक वेतन मिळाले असून ४० लाखांहून अधिक व पंधरा लाखांहून अधिक वार्षिक वेतन मिळालेले अनुक्रमे ११ व ३९ विद्यार्थी आहेत. जगभरातील नामवंत कंपन्यांची महाविद्यालयाला दिलेली पसंती उच्च गुणवत्तेची पावती आहे.

- प्रा. संजय धायगुडे, अधिष्ठाता, कार्पोरेट रिलेशन, माजी विद्यार्थी व विद्यार्थी कल्याण

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.