उल्हासनगर (सुभाष टेकडी): महापुरुषांच्या संयुक्त जयंती व वैशाख बौद्ध पौर्णिमा निमित्त स्वराज्य संघटनेच्या वतीने "धम्मपद – एक धम्मदेसना" या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या साक्षीने हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भव्यतेत पार पडला.
कार्यक्रमात आयुष्यभर बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करणारे भंते डॉ. एन. आनंद महाथेरो यांना “शक्यमुनी पीस अवॉर्ड” देऊन गौरविण्यात आले. तसेच, भारतातील पहिली डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऍडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटर तळोजा येथे सुरू करणारे आणि तिथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्वखर्चाने बसवणार असल्याची घोषणा करणारे सन्मा. ॲड. गजानन चव्हाण (सदस्य, महाराष्ट्र व गोवा वकील परिषद) यांना भीमरत्न पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात उल्लेखनीय सामाजिक योगदानाबद्दल खालील मान्यवरांनाही भीमरत्न पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात आले:
सन्मा. कल्याणजी घेटे (सहाय्यक पोलिस आयुक्त, कल्याण)
सन्मा. शैलेश काळे (सहाय्यक पोलिस आयुक्त, अंबरनाथ)
सन्मा. सुखदेव पाटील (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग)
सन्मा. लताताई पडघाण (बौद्ध धम्म प्रचारक)
कार्यक्रमात पहलगाम येथील हल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी कार्यक्रमात "जात नहीं धर्म पूछा" या विषयावर भाष्य करत बुद्धाचे पंचशील व अष्टांग मार्ग सर्व धर्मीयांनी आत्मसात करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "जो माणूस पंचशील आणि अष्टांग मार्ग पाळतो, तो कधीच हिंसा करत नाही." कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वराज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी अतिशय मेहनत घेतली आणि हजारोंच्या संख्येने आलेल्या नागरिकांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.