Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीतील लूटमारीचा तासाभरात छडा

सांगलीतील लूटमारीचा तासाभरात छडा



सांगली :  शहरातील नवीन वसाहतीजवळ मध्यरात्री झालेल्या लूटमारीचा तासाभरात छडा विश्रामबाग पोलिसांनी लावला. अल्पवयीनासह सहाजणांना अटक करून चोरीस गेलेला ९२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सिद्धांत अशोक भुते याने पोलिसात फिर्याद दिली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आदित्य रमेश भारती (वय ३०), आर्यन चंद्रकांत नाईक (१९), यागेश धनंजय शिंदे (२१, सर्व रा. खणभाग, सांगली), रोहित रमेश देशपांडे (२४), इरफान जहांगीर मुल्ला (२१, दोघे रा. शामरावनगर, सांगली) आणि एक अल्पवयीन यांचा समावेश आहे.


फिर्यादी सिद्धांत भुते याच्यासह पाचजण मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी सर्व संशयित नशा करण्यासाठी बसले होते. त्यांनी पाचजणांना अडविले. दमदाटी करून त्यांच्याकडील मोबाईल, सोन्याची कानातील बाली, चांदीचे कडे, महागडे घड्याळ असा ९२ हजाराचा मुद्देमाल चोरून पोबारा केला होता. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सहायक निरीक्षक चेतन माने, पोलिस उपनिरीक्षक सुजाता भोपळे, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर यांच्यासह पथकाने संशयितांना अटक केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.