Breaking News! सांगली खुनाची मालिका सुरुच मिरज एमआयडीसीमध्ये मध्यरात्री एकाला भोसकून संपवलं; आरोपी फरार
मिरज एमआयडीसीतील सह्याद्री स्टार्च कंपनीच्या मागील शिवशक्तीनगर भागात मध्यरात्री चाकूने भोसकून एका तरुणाचा खून करण्यात आला. श्रवणेशनाथ महावीर चौगुले (वय 29, रा. भोसे, ता.मिरज) असे मयताचे नाव असून, खून करून मारेकरी फरार झाले आहेत. खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कुपवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर आणि त्यांच्या पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.