Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका, भारतात iPhone कंपन्या उभारु नका, त्यांचं त्यांना पाहू द्या, CEO ना आदेश

Breaking News!  डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका, भारतात iPhone कंपन्या उभारु नका, त्यांचं त्यांना पाहू द्या, CEO ना आदेश



नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 7 मे रोजी पाकिस्तानच्या  हद्दीत घुसून 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. त्यानंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, दोन्ही देशांकडून सैन्य दलाच्या कारवाया सुरू झाल्या होत्या.

त्यामध्ये, भारतीय वायू दलाने आपली ताकद दाखवून दिल्याने जगाचे लक्ष याकडे लागले होते. त्यातच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन भारत-पाकिस्तान यांच्यातील कारवाया थांबल्याचं सांगितलं. ट्रम्प यांनी ट्वटि करुन दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. विशेष म्हणजे आपणच यात मध्यस्थी केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. त्यानंतर, वारंवार ट्रम्प यांनी तो उल्लेख करत, भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधी थांबवावी अन्यथा दोन्ही देशांसोबत अमेरिका व्यापार संबंध तोडून टाकेल, असा दबावच टाकल्याचे म्हटले. त्यानंतर, आता ट्रम्प यांनी कतारमधील उद्योजकांच्या भेटीत भारतात Apple कंपन्या न उभारण्याचा सल्ला अॅपलचे सीईओ टॅम कुक यांना दिला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती आता निवळली असून दोन्ही देशांच्या सीमारेषेवरील चकमक शांत झाली आहे. मात्र, ट्रम्प यांची मध्यस्थी हा चर्चेचा विषय बनला असून भारत पाकिस्तान यांच्यातील वादाचा तिसऱ्या कुणाचाही मध्यस्थी चालणार नसल्याचे भारतानेही ठणकावले आहे. तसेच, अणवस्त्राचा दबाव आमच्यावर लादू नये, असेही भारत सरकारने स्पष्ट केले आहे. त्यानंतर, आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी Apple कंपनीचे CEO टिम कुक यांना भारतात कारखाने उभारू नयेत, असं स्पष्टपणे सांगितलं. कतारमध्ये झालेल्या त्यांच्या भेटीत ट्रम्प यांनी कुक यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत ही माहिती दिली. "माझं टिम कुकसोबत बोलणं झालं. तो भारतात सर्वत्र कारखाने उभारत आहे. मी त्याला स्पष्ट सांगितलं - मला भारतात काहीही नकोय," असं ट्रम्प यांनी म्हटलं. या चर्चेनंतर Apple अमेरिकेत उत्पादन वाढवणार असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले.

दरम्यान, ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे Apple च्या भारतातील उत्पादन योजना अडचणीत येऊ शकतात. सध्या अॅपल कंपनींकडून चीनवरील अवलंबन कमी करण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणावर iPhone उत्पादन केले जात आहेत. विशेष म्हणजे पुढील वर्षअखेरीस भारतातूनच अमेरिकेसाठी iPhone आयात करण्याची तयारी आहे. सध्या Apple ची एकही iPhone उत्पादन युनिट अमेरिका देशात नाही. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे आता आयफोन कंपनी खरंच अमेरिकेत उत्पादन सुरू करणार का, हे पाहावे लागेल.

अमेरिकेत कंपन्या उभारण्याचा सल्ला

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर 90 दिवसांची टेरिफ (कर) सवलत जाहीर करण्यात आली असून, त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी Apple कंपनीचे CEO टीम कुक यांच्याशी चर्चा केली. भारतात iPhone निर्मितीबाबत Apple च्या योजनांवर प्रतिक्रिया देताना ट्रम्प म्हणाले, "भारतात कारखाने उभारण्याची गरज नाही, भारत स्वतःचं पाहू शकतो." कुक अमेरिकेत आणखी प्लांट्स उभारण्याचा विचार करत आहेत. हे Apple च्या याआधीच्या $500 अब्ज गुंतवणुकीच्या वचनाशी सुसंगत आहे. मात्र, याच दरम्यान कंपनीने भारतातही iPhone उत्पादन वाढवण्याची घोषणा केली होती.

अॅपलने भारतात तयार केली 1.83 लाख कोटी iphone
Apple चे iPhone मुख्यतः Foxconn च्या दक्षिण भारतातील युनिटमध्ये तयार होतात. Tata Group ने Wistron चा भारतीय व्यवसाय खरेदी केला असून Pegatron च्या ऑपरेशन्सही चालवत आहे. Tata आणि Foxconn दोघंही भारतात नवीन कारखाने उभारत आहेत, असे Bloomberg च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, मार्च 2024 पर्यंतच्या 12 महिन्यांत Apple ने भारतात सुमारे $22 अब्ज (सुमारे ₹1.83 लाख कोटी) किमतीचे iPhone तयार केले, ज्यात 60% ची वाढ नोंदवण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.