Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हिंदू मुली म्हणजे बालकांना जन्म घालण्याचे मशिन -गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त वक्तव्य, सभेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकल्याने खळबळ

हिंदू मुली म्हणजे बालकांना जन्म घालण्याचे मशिन -गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त वक्तव्य, सभेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकल्याने खळबळ


नाशिक: नाशिकच्या सिडको परिसरात आयोजित हिंदू विराट सभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जोरदार भाषण करत अनेक वादग्रस्त विधानं केली. मात्र, या सभेदरम्यान एक अनपेक्षित आणि संतापजनक प्रकार समोर आला. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फोटो सभेच्या गर्दीत झळकले, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला आणि राज्यभरात चर्चेला उधाण आलं.



मंदिरांमध्ये विटंबना, सीसीटीव्ही आणि धर्म दलांची मागणी
पडळकर यांनी आपल्या भाषणात सध्या राज्यातील विविध भागांमध्ये देवी-देवतांच्या मूर्तींची विटंबना होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत हे नियोजनबद्ध कटकारस्थान असल्याचा आरोप केला. त्यांनी सरकारकडे मागणी केली की, सर्व मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश द्यावेत. तसेच, प्रत्येक गावात 'धर्म दल' स्थापन करून धार्मिक सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात, असे ते म्हणाले. तसेच खरेदी करताना दुकानदाराच्या कपाळावर टिळा आहे की नाही हेही बघा असेही त्यांनी सांगितले.

हिंदू मुली आणि धर्मांतरणाचा मुद्दा

पडळकर यांनी शाळा, कॉलेजांतील मुलींच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अत्यंत वादग्रस्त विधान केलं. "हिंदू मुली म्हणजे फक्त मुलांना जन्म देणारी यंत्रं बनली आहेत, असं चित्र दिसतंय." त्यांनी पुढे आरोप केला की, "मुस्लिम धर्मात जातींमध्ये लग्न होत नाही, पण आमच्या मुलींना ते बाटवत आहेत." या वक्तव्यामुळे महिलांबाबतच्या दृष्टिकोनावर गंभीर टीका होऊ लागली आहे.


गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो सभेत का?
या आक्रमक भाषणाच्या दरम्यान एका अल्पवयीन मुलाने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो हातात धरून उभं राहत सभेची दिशा पूर्णपणे बदलली. दुसऱ्या एका मुलाकडे क्रांतीवीर भगतसिंह यांचा फोटो होता. यामुळे उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. माध्यमांचे लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं आणि हा प्रकार लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला.

कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?

लॉरेन्स बिश्नोई हा देशातील सर्वाधिक कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांपैकी एकाचा प्रमुख आहे. त्याच्यावर ८४ हून अधिक गुन्हे, ज्यात खंडणी, खून, ड्रग्स तस्करी आदींचा समावेश आहे. त्याची गँग भारतातच नव्हे तर कॅनडा, अमेरिका, युरोप व आखाती देशांमध्येही सक्रिय आहे. सिद्धू मूसेवालाची हत्या, सलमान खानवर हल्ल्याचा प्रयत्न, सुखदूल सिंग आणि करणी सेनेचे प्रमुख सुखदेव गोगामेडी यांच्या हत्या, या सर्व घटनांमध्ये या गँगचा हात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

राजकीय प्रतिक्रिया आणि जनतेचा संताप
या घटनेनंतर राजकीय वर्तुळात संतापाचं वातावरण आहे. सभेत गँगस्टरचा फोटो झळकणं हा केवळ सुरक्षेचा प्रश्न नाही, तर सभेच्या उद्देशावरही प्रश्न उपस्थित करणारा प्रकार आहे. पडळकर यांच्या भाषणातल्या वादग्रस्त विधानांवरही सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.