Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नवल किशोर राम PMO मधून थेट पुण्याचे आयुक्त, आठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

नवल किशोर राम PMO मधून थेट पुण्याचे आयुक्त, आठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
 

मुंबई : राज्यात प्रशासकीय खांदेपालट सुरूच असून आताही आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पंतप्रधान कार्यात प्रतिनियुक्तीवर गेलेले नवल किशोर राम  यांची बदली पुन्हा एकदा पुण्यात करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता पुणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. तर शितल तेली उगळे  यांच्याकडे पुण्यातील क्रीडा आणि युवा आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

ज्येष्ठ आयएएस अधिकारी जे एस पापळकर यांच्याकडे धुळ्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी होती. त्यांची बदली आता छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर धुळ्याच्या जिल्हाधिकारीपदी भाग्यश्री विसपुते यांची बदली करण्यात आली आहे. सी के डांगे यांच्याकडे आता सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिव कार्यालयाच्या सहसचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची बदली बृहन्मुंबई जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. तर अमरावतीच्या जिल्हाधिकारीपदी आशिष येरेकर यांची बदली करण्यात आली आहे.

 कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?
1. नवल किशोर राम (IAS:RR:2008) - आयुक्त, पुणे महानगरपालिका
2. शीतल तेली-उगले (IAS:RR:2009) - क्रीडा आणि युवा आयुक्त, पुणे
3. जे.एस. पापळकर (IAS:SCS:2010) - विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर
4. सी.के. डांगे (IAS:SCS:2010) - सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग
5. सौरभ कटियार (IAS:RR:2016) जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा
6. भाग्यश्री विसपुते (IAS:RR:2017) जिल्हाधिकारी, धुळे
7. आनंद भंडारी (IAS:NON-SCS:2017) मुख्य कार्यकारी अधिकारी, अहिल्यानगर जिल्हा परिषद
8. आशिष येरेकर (IAS:RR:2018) जिल्हाधिकारी, अमरावती

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.