Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची 100 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची 100 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

 
    मैसूर अर्बन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी अर्थात मुडा कथित घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी संबंधित 100 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

ईडीने ही कारवाई पीएमएलए कायद्या अंतर्गत केली आहे.

म्हैसूरच्या लोकायुक्त पोलिसांनी यापूर्वीच मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच इतरांविरोधात आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यासाठी राज्यपालांनी सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालविण्याची परवानगी दिली होती. ईडीने आज 92 मालमत्ता जप्त केल्या. बाजार भावानुसार त्याचे मूल्य 100 कोटी रुपये आहे.

काय आहेत आरोप?

म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने (मुडा) कसाबा होबळी येथील कसारे गावातील 3 एकर 16 गुंठे जमीन अधिग्रहीत केली. निवासी क्षेत्र विकसित करण्यासाठी ही जमीन अधिग्रहीत केली. या जमिनीच्या बदल्यात सिद्धरामय्या यांच्या पत्नी आणि काही संबंधितांना म्हैसूरच्या पॉश भागात 14 जागा दिल्याचा आरोप आहे. त्याची किंमत कोटय़वधी रुपये आहे. हा जमीन घोटाळा असल्याचा आरोप एका आरटीआय कार्यकर्त्याने केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास ईडीकडून केला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.