सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असलेल्या युवकांसाठी कर्मचारी निवड आयोगाच्या नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. SSS (स्टाफ सिलेक्शन कमिशन) कडून यावर्षी संयुक्त पदवीधर पातळी परीक्षा (SSC CGL 2025) साठी 14 हजार 582 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू
झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार SSC च्या ssc.gov.in या अधिकृत
वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
9 जून पासून या पदासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून 4 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये अर्ज करणारे उमेदवार 5 जुलै पर्यंत अर्जाचे शुल्क भरू शकतात. अर्जातील कोणतीही चूक दुरुस्त करायची असेल तर ती करण्याची संधी 9 ते 11 जुलै दरम्यान उपलब्ध असेल.
वेगवेगळ्या पदांसाठी भरती
या भरती अंतर्गत, केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि मंत्रालयांमध्ये गट 'ब' आणि गट 'क' पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ग्रुप B मध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इनकम टॅक्स इंस्पेक्टर, सेंट्रल एक्साइज इंस्पेक्टर, नारकोटिक्स इंस्पेक्टर, सब-इंस्पेक्टर, रिसर्च असिस्टंट, पोस्टल निरीक्षक सारख्या पदांचा समावेश आहे. तसेच, ग्रुप C में ऑडिटर, टॅक्स असिस्टंट, पोस्टल असिस्टंट, एकाउंटंट, अपर डिव्हिजनल क्लर्क या पदांवर भरती केली जाणार आहे.
वयोमर्यादा
पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळ्या प्रकारे निश्चित करण्यात आली आहे, जसे की 18 ते 27 वर्षे, 18 ते 30 वर्षे किंवा 20 ते 30 वर्षे. वयाची गणना 1 ऑगस्ट 2025 च्या आधारे केली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.
अर्जाचे शुल्क किती?
सामान्य (Open) आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तर महिला, एससी (SC)/एसटी (ST) प्रवर्ग, अपंग आणि माजी सैनिकांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. कंप्यूटर-आधारित चाचणी (CBT) आणि त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी अशा दोन टप्प्यात निवड प्रक्रिया पार पाडली जाईल. टियर-1 आणि टियर-2 या दोन्ही परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारच्या असतील.
कधी होईल परीक्षा?
SSC-CGL टियर-1 परीक्षा 13 ते 30 ऑगस्ट 2025 दरम्यान घेतली जाईल. त्यानंतर, टियर-2 परीक्षा डिसेंबर 2025 मध्ये घेण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजेच, उमेदवारांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.