Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

. अल आजम सलीम जमादार, स्थापत्य अभियंता (मानधन) यांना मा आयुक्त सत्यम गांधी यांनी मनपाच्या या सेवेतुन कार्यमुक्त केले आहे.

अल आजम सलीम जमादार, स्थापत्य अभियंता (मानधन) यांना मा आयुक्त सत्यम गांधी यांनी मनपाच्या या सेवेतुन कार्यमुक्त केले आहे.
 

अधिकारी ,कर्मचारी यांनी नियमात  ,शिस्तीत राहून कामकाज करावे , बेशिस्त वर्तन  खपवून घेतली जाणार नाही, कारवाई होणार:-मा सत्यम गांधी आयुक्त भा प्र से  सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय क्र. ३. कुपवाड कार्यालयाकडे सोमवार दिनांक २८/४/२०२५ रोजी दुपार सत्रामध्ये मा आयुक्त यांनी  समक्षात भेट दिली असता, सदर कार्यालयामध्ये नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले आहे. संबंधीत नागरिकांच्याकडे विचारणा केली असता, नागरिकांनी नगररचना विभागाकडे काम असलेबाबत व ब-याच दिवसापासून कामाचा पाठपुरावा करून देखील काम होत नसलेबाबत समक्षात तक्रार प्राप्त झाला आहे .

त्या अनुषंगाने नगररचना विभागाकडील दैनंदिन कामकाजाचा निपटारा वेळेत होत नसल्याचे निदर्शनास आले आहे व कार्यालयीन वेळेमध्ये श्री. अल आजम सलीम जमादार, स्थापत्य अभियंता (मानधन) हे नगररचना कार्यालयात अथवा क्षेत्रिय कार्यालय क्र. ३ मध्ये उपस्थित नसल्याचे आढळून आले आहे, तसेच त्यांनी हालचाल नोंदवहीमध्ये देखील नोंद केली नसल्याचे आढळून आले आहे. तसेच नगररचना विभागाकडील प्रस्तावास मान्यता देण्याच्या बदल्यात आर्थिक मोबदला देण्याबाबत आयुक्त यांना समक्षात विचारणा केल्याचे निदर्शनास आले आहे.

श्री. अल आजम सलीम जमादार, स्थापत्य अभियंता (मानधन) यांनी नगररचना कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करण्याची त्यांची जबाबदारी असताना त्यांनी ती जबाबदारी पार पाडणे आवश्यक होते. तसेच जर त्यांना नगररचना विभागाकडील कामकाजाकरिता कार्यालय सोडणे आवश्यक असते तर त्यांनी नगररचना विभागाकडील हालचाल नोंद वहीमध्ये नोंद करूनच कार्यालय सोडणे आवश्यक होते. तथापी त्यांनी हालचाल नोंदवही मध्ये कोणत्याही प्रकारची नोंद न करता तसेच वरिष्ठांची कोणतीही परवानगी न घेता कार्यालय सोडलेचे निदर्शनास आले आहे. तसेच वरिष्ठांना लाच स्विकारण्याबाबत प्रवृत् करीत असल्याची अत्यंत गंभीर बाब निदर्शनास आली आहे.

श्री. अल आनम सलीम जमावार, स्थापत्य अभियंता (मानधन) यांची वर्तणूक ही कार्यालयीन शिस्तीस सोडून असलेने, त्यांनी पदीय कर्तव्यात कसूर करुन महापालिका नियमांचे उल्लंघन करून कार्यालयीन शिस्तीचा भंग केला असल्या आहे . श्री. अल आजम सलीम जमादार, स्थापत्य अभियंता (मानधन) यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांचेकडून विहीत मुदतीत लेखी खुलासा मागविण्यात आलेला होता. त्यास अनुसरून श्री. अल आजम सलीम जमादार, स्थापत्य अभियंता (मानधन) यांनी  खुलासा सादर  केलेला आहे. श्री. जमादार, स्थापत्य अभियंता (मानधन) यांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसून त्यांनी त्यांचे पदीय कर्तव्यात कसूर करून कार्यालयीन शिस्तीचा भंग केलेला आहे. श्री जमादार यांचे कृत्य  अतिशय गंभीर स्वरुपाची, कार्यालयीन शिस्तीस सोडून असल्याने  कारवाईस पात्र झाले आहेत. श्री. अल आजम सलीम जमादार, स्थापत्य अभियंता (मानधन) यांना मा आयुक्त सत्यम गांधी यांनी मनपाच्या या सेवेतुन कार्यमुक्त केले आहे.

जन संपर्क अधिकारी 

सदरची बातमी प्रसिद्ध करावी ही विनंती

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.