Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सोनम वडिलांसोबत मिळून नेमका कोणता व्यवसाय करायची? देशभरात 1600 कोटींचा व्यवसाय

सोनम वडिलांसोबत मिळून नेमका कोणता व्यवसाय करायची? देशभरात 1600 कोटींचा व्यवसाय
 

मेघालयात हनिमून साजरा करण्यासाठी गेलेल्या राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी खुलासा केला आहे. मेघालय पोलिसांनी याप्रकरणी राजाची पत्नी सोनमला उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमधून अटक केली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मेघालय या तिन्ही राज्यांमध्ये या हत्याकांडामुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनी इंदोरचा व्यावसायिक राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशीला वाराणसी-गाजीपूर हायवेवरील एका ढाब्यावरुन ताब्यात घेतलं आहे. सोनमने कथितपणे आपला प्रियकर आणि इतरांच्या माध्यमातून मेघालयाच पतीच्या हत्येचा कट आखला होता असा पोलिसांचा दावा आहे.

इंदोर पोलिसांनी विशालला ठोकल्या बेड्या
पोलिसांनी दावा केला आहे की सोनम आधीच हत्येत सहभागी आरोपी विशाल सिंग आणि राज कुशवाहाला ओळखत होती. ती त्यांच्यासोबत शिलाँगलाही गेली होती. राज कुशवाह हा सोनमचा प्रियकर असल्याचं म्हटलं जात आहे. विशाल सिंग चौहान उर्फ ​​विकी याला इंदूर पोलिसांनी आधीच अटक केली आहे. असे सांगितले जात आहे की तिन्ही आरोपी सोनमचा भाऊ गौरव रघुवंशी याच्या नावाने नोंदणीकृत एका खाजगी कंपनीत काम करत होते. राज त्या कंपनीत अकाउंटंट होता. इंदूरमधून बीबीए केलेल्या आकाशची या प्रकरणात नेमकी काय भूमिका आहे आणि हेतू याबद्दल चौकशी केली जात आहे.
सोनमच्या भावाच्या नावे कंनी नोंद

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनमच्या वडिलांचा सनमिकाचा व्यवसाय आहे. त्याच्या वडिलांनी मुलाच्या नावाने एक कंपनी सुरु केली होती. तिन्ही आरोपी या कंपनीत काम करत होते. भारतात सनमिकाचा व्यवसाय फार मोठा आहे. एका रिपोर्टनुसार, 2024 मध्ये देशात डेकोरेटिव्ह लॅमिनेटचा बाजार आकार सुमारे 16000 कोटी रुपये होता. 2023 मध्ये सनमिकासह इतर डेकोरेटिव्ह लॅमिनेटचा बाजार 7.11 अब्ज अमेरिकन डॉलर्स होता. त्याची बाजारपेठ सतत वाढत आहे.

काय आहे सनमाइका?
सनमिका ही घरातील फर्निचरवर वापरली जाणारी सजावटीची शीट आहे. ती अनेक पातळ कागदाचे थर आणि डिझाइन केलेला थर मिसळून तयार केली जाते. ती तयार करण्यासाठी एका विशेष प्रकारच्या रेझिन (मेलामाइन रेझिन) चा वापर केला जातो. घर सजवण्यासाठी आणि लाकडी फर्निचर तयार करण्यासाठी सनमिका वापरली जाते. ती बहुतेकदा फर्निचर, भिंती आणि फरशीवर लावली जाते. लोक स्वयंपाकघरातील काउंटरटॉप सजवण्यासाठी देखील सनमिका शीटचा वापर करतात. भिंती सजवण्यासाठी आणि त्यांना एक नवीन लूक देण्यासाठी देखील सनमिकाचा वापर केला जातो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.