Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एअर इंडिया च्या फ्लाइटमध्ये हाहाकार, अचानक बॅगा पडल्या आणि प्रवाशांमध्ये गोंधळ; 171 प्रवाशांचे प्राण कंठाशी!

एअर इंडिया च्या फ्लाइटमध्ये हाहाकार, अचानक बॅगा पडल्या आणि प्रवाशांमध्ये गोंधळ; 171 प्रवाशांचे प्राण कंठाशी!
 

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाला अपघात होऊन 275 प्रवाशांचा मृत्यू झाला. यानंतर देशावर दु:खाचा डोंगर कोसळला. यानंतर अनेकांनी विमान प्रवासचा धसका घेतला. यातील प्रवाशांचा जळून मृत्यू झाला असून त्यांची ओळख पटवली जातेय. तसेच यातील ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून अपघाताचे खरे कारण शोधले जातेय. दरम्यान एअर इंडिया विमानासंदर्भात आणखी एक वृत्त समोर आलंय.

मंगळवारी दिल्लीहून पाटणाला जाणारे एअर इंडियाचे विमान AI-407 एका भयानक घटनेला बळी पडले. विमानात अचानक गोंधळ सुरु झाला ज्यामुळे प्रवाशांना जोरदार धक्का बसला. यादरम्यान विमानातील 171 प्रवाशांमध्ये भीती पसरली. एअर इंडियाच्या विमानातील गोंधळ इतका मोठा होता की सीटवर ठेवलेल्या बॅगा खाली पडल्या. ज्यामुळे प्रवाशांमधील भीती आणखी वाढली. त्यावेळी अनेक प्रवासी नाश्ता करत होते. पण धक्क्यांमुळे त्यांचे अन्न आणि पेये देखील विखुरले गेले. प्रवाशांना काहीतरी अनुचित घडण्याची भीती वाटू लागली. विमानातील वातावरण तणावपूर्ण झाले.

प्रवाशांमध्ये पसरली भिती
गोंधळादरम्यान विमानातून प्रवास करणारे प्रवासी घाबरले. अचानक झालेल्या धक्क्यांनंतर सर्व प्रवाशांना त्यांच्या जागीच बसवण्याचा निर्णय घेतला.बॅगा आणि सामान पडल्यामुळे मोठा अपघात होणार आहे असे वाटले. मुले आणि वृद्धांमध्ये भीती आणखीनच होती, असे एका प्रवाशाने सांगितले. नाश्त्यादरम्यान गरम पेये सांडल्याने काही प्रवाशांना त्रास झाल्याचेही एकाने म्हटले. असे असले तरी यात कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. या कठीण परिस्थितीत संयम राखणाऱ्या पायलट आणि क्रू मेंबर्सचे प्रवाशांनी कौतुक केलय.
पायलटने सावधगिरीने वाचवला जीव

या आव्हानात्मक परिस्थितीत पायलटने आपली सावधगिरी आणि अनुभव दाखवला. त्याने विमानावर नियंत्रण मिळवून परिस्थिती नियंत्रित केली. यानंतर एअर इंडियाचे विमान पाटणा विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले. लँडिंगनंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि क्रू मेंबर्सचे कौतुक केले.

एअर इंडियाकडून चौकशी
एअर इंडियाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल असे म्हटलंय. या घटनेने पुन्हा एकदा विमान प्रवासादरम्यान होणाऱ्या गोंधळाचे धोके अधोरेखित केले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.