विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालं. मात्र महायुतीतील घटक पक्षातील अंतर्गत आरोप प्रत्यारोप थांबायला तयार नाही. या तीनही पक्षांमध्ये पालकमंत्रीपदं, निधी आणि श्रेयवादीची लढाई कायम आहे. त्यात आता प्रताप सरनाईकांच्या एका लेटर बॉम्बची कारण 2022 साली अशाच एका लेटर बॉम्बमुळे राज्यातील सत्ता पालटली होती. एकनाथ शिंदे यांनी बंडकरून थेट भाजपसोबत सत्तास्थापन केली होती. त्यामुळे तसंच पत्र पुन्हा समोर आल्याने ही भविष्यातील वेगळ्या राजकारणाची नांदी ठरणार का? अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे.
नेमकं प्रकरणं काय?
एकदा देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झालं आहे. मात्र 100 दिवसांत अनेक वेळा महायुतीतील घटक पक्षातील मंत्र्यांमध्ये पालकमंत्री, महामंडळे, निधी वाटप, श्रेय वादावरून तू-तू मैं-मैं पाहायला मिळत आहे. शिंदे शिवसेनेच्या मंत्र्यांकडून अर्थमंत्री अजित पवार निधी वाटपात योग्य तो न्याय देत नसल्याचा आरोप होत आहे.
धाराशिवचे पालकमंत्री असलेले शिंदे शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटींच्या विकास निधीला स्थगिती दिली आहे. निधी अडून धरल्याचा थेट आरोप केला असून त्या संदर्भात थेट त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.तसेच भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे नोंदवलेल्या आक्षेपामुळेच निधी थांबलाय.असा आरोप शिवसेना नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
त्यातच भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी धाराशिवमध्ये एका कार्यक्रमात कुणी कितीही ताकद दाखवली? कसेही नाचलं, तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा. असं म्हणत शिंदे शिवसेनेला म्हणजे प्रताप सरनाईक यांना डिवचले होते. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री फडवीस यांनी त्यांना समज दिली होती. त्यासोबत नितेश राणे यांचे बंधू शिवसेना आमदार निलेश राणे यांनी अशा प्रकारची भाषा करणे योग्य नसल्याचा सल्ला दिला होता.महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी अजित पवार पुरेसा निधी उपलब्ध करून देत नसल्यामुळे आपण भाजपासोबत गेल्याची वलग्ना शिंदे शिवसेना करती मात्र पुन्हा एकदा त्याच अर्थमंत्री अजित पवारांसोबत सत्तेत बसण्याची वेळ आल्यामुळे शिंदे शिवसेनेची कोंडी झाल्याचे बोलले जात आहे. त्यातूनच अशा प्रकारे शिवसेनेची खदखद त्यांच्या मंत्री आणि नेत्यांच्या वक्तव्य, पत्राच्या माध्यमातून बाहेर येताना दिसते.महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्या खात्याकडून होत असलेल्या निधी वाटपा संदर्भात विरोध दर्शविणाऱ्या प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉबनंतर तब्बल एका वर्षानंतर अर्थात 2022 साली शिवसेना पक्षात तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव करून भाजपासोबत युती करून मुख्यमंत्री बनले. राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधी वाटपावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना लिहिलेला लेटर बॉम्ब मुळे भविष्यातील एखाद्या राजकीय भूकंपाचे संकेत तर नाही ना अशा प्रकारच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.