ग्लोबल वार्मिंगचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे.समुद्राची पातळी वाढत आहे. यामुळे जगातील अनेक शहर समुद्रात बुडण्याची भिती व्यक्त केली आहे. याबाबत नासाने एक अवर्ट जारी केला असून समुद्रात बुडणाऱ्या देशांच्या यादीत भारतातील 5 शहरांचा समावेश आहे. सिंगापूरच्या एनटीयूने याबाबतच एक अहवाल
जारी केला आहे. जगभरातील अनेक शहरे वेगाने बुडत आहेत. भारतातील ५
शहरांचाही या यादीत समावेश आहे. नासाने इशारा दिला आहे की समुद्राची वाढती
पातळी या शहरांसाठी धोका आहे. कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, मुंबई आणि सुरत
ही 5 शहरे धोक्यात आहेत. या शहरांमध्ये नेमकी काय भयानक स्थिती निर्माण होऊ
शकते. याचा देखील उल्लेख या इहवालात करण्यात आला आहे.
कोलकाता
2014 ते 202 दरम्यान, कोलकात्यातील जमीन दरवर्षी 0.01 ते 2.8 सेंटीमीटरने बुडाली आहे. भाटपारा परिसर सर्वाधिक बुडाला आहे. 90 लाख लोक बाधित भागात राहतात, जिथे पूर आणि भूकंपाचा धोका वाढला आहे.
चेन्नई
चेन्नईमध्येही जमीन वेगाने समुद्रात बुडत आहे. थरामणी परिसरात सर्वाधिक 3.7 सेमी. भूस्खलन झाले आहे.
अहमदाबाद
अहमदाबादमधील जमीन दरवर्षी 0.01 ते 5.1 सेमीने बुडाली आहे. पिपलाज परिसरात सर्वाधिक 4.2 सेमी बुडाली आहे. या बुडालेल्या भागात 51 लाख लोक राहतात. समुद्राच्या पातळीत 0.59 सेमीने वाढ झाल्यामुळे पुराचा धोका वाढला आहे, याचे मुख्य कारण भूजलाचा वापर आहे.
मुंबई
अरबी
समुद्राच्या काठावर वसलेले मुंबई शहरही या यादीत अव्वल आहे. नासाने इशारा
दिला आहे की मुंबईत पुराचा धोका आधीच जास्त आहे आणि आता परिस्थिती आणखी
बिकट होऊ शकते.
सुरत
सुरतही वेगाने बुडत आहे. समुद्राची वाढती पातळी त्याच्यासाठी धोका आहे. एनटीयूच्या अभ्यासात बाधित शहरांमध्ये सुरतचाही समावेश करण्यात आला आहे. भूजलाचा अतिवापर आणि हवामान बदल ही याची कारणे आहेत. सुरत हे एक मोठे औद्योगिक शहर आहे, जे बुडल्यास त्याचे खूप नुकसान होऊ शकते. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता जगातील सर्वात वेगाने बुडत आहे. त्याचा अर्धा भाग समुद्रसपाटीपासून खाली आहे. 1970 पासून काही भाग 4 मीटरने बुडाले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.