Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

71 वर्षांच्या 'या' लोकप्रिय अभिनेत्यानं दान केली 4000 कोटींची संपत्ती; मुलाला दिला नाही एकही रुपया

71 वर्षांच्या 'या' लोकप्रिय अभिनेत्यानं दान केली 4000 कोटींची संपत्ती; मुलाला दिला नाही एकही रुपया


एका लोकप्रिय अभिनेत्यानं त्याची 4000 कोटींची संपत्ती दान केली आहे. त्यानं त्याच्या मुलाला ही संपत्ती देण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 4000 कोटींची संपत्ती दान केली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा अभिनेता कोण आहे. तर तो दुसरा कोणी नसून त्याच्या अॅक्शनसाठी चर्चेत असतो तो म्हणजे जॅकी चॅन. जॅकी चॅननं 90 च्या दशकात सगळ्यांच्या मनावर राज्य केलं. ब्रूस ली आणि जेटलीनंतर जर कोणता चीनी अभिनेता आहे ज्याची लोकप्रियता इतकी वाढली आहे. तर तो दुसरा कोणी नसून जॅकी चॅन आहे.

 

खरंतर जॅकी चॅननं एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या संपत्तीला घेऊन सांगितलं की त्यानं त्याची संपूर्ण संपत्ती ही त्याच्या मुलाला न देता दान केली आहे. जॅकी म्हणाला की, त्याचा मुलगा इतका सक्षम आहे की तो स्वतः च्या पायावर उभा राहू शकतो आणि पैसे कमावू शकतो. जर तो तसं करू शकत नसेल तर तो सगळ्या पैशांची उधळपट्टी करेल. जॅकी चॅन म्हणाला की जर तो सक्षम आहे, तर तो स्वतः पैसे कमावू शकतो. जर ते तो करु शकत नाहीं तर तो फक्त पैसे खर्च करेल. त्याशिवाय जॅकी चॅनला त्याच्या मुलाला खूप कमी वयात सैनेत घातल्याचं देखील दुःख आहे.

जॅकी चॅनविषयी बोलायचं झालं तर त्यानं बाल कलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात करिअरची सुरुवात केली. ब्रूस लीच्या चित्रपटाच त्यानं सहाय्यक अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातील अॅक्शन सीन्समध्ये तो सपोर्टर म्हणून रहायचा पण नंतर चीनच्या सगळ्यात मोठ्या अॅक्शन पैकी एक ठरली आहे. जर चीनचा कोणता अभिनेता हॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाला आहेत. जर हॉलिवूडमध्ये जाऊन कोणता चीनचा अभिनेता हा लोकप्रिय झाला असेल तर तो जॅकी चॅन आहे. लहानपणापासून जॅकी चॅन हा शिक्षेविषयी बोलणारे जॅकी चॅन या रक्कमेचा उपयोग हा गरिब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च करण्याची योजना करत आहेत. तर जॅकी चॅनकडून या विषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. ही माहिती काही वर्षांपूर्वी व्यक्त करण्यात आली होती. 


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.