Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

छताचा पंखा, 71 किलो वजन अन् साडी; वैष्णवी हगवणे प्रकरणात खळबळजनक ट्विस्ट, फॉरेन्सिक तपासातून

छताचा पंखा, 71 किलो वजन अन् साडी; वैष्णवी हगवणे प्रकरणात खळबळजनक ट्विस्ट, फॉरेन्सिक तपासातून



पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात एक नवीन द्विस्ट आलाय. आता या प्रकरणाला एक नवीन दिशा मिळणार असल्याचं दिसतंय. या प्रकरणातील महत्वाचे पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. खरं तर वैष्णवीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली? याची उकल अजून झालेली नाही. वैष्णवीने साडीने गळफास घेतल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे आता गळफास घेतलेली साडी आणि पंखा तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये  पाठण्यात येणार आहे.

 
सासरच्या मंडळींकडून छळ

वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर संपूर्ण राज्य हादरून गेलंय. ही घटना समोर येताच महिलांवरील अत्याचार, हुंड्यासाठी त्रास, सासरच्या मंडळींकडून होणारा छळ असे अनेक प्रकरणं समोर आले आहेत. राज्यामध्ये अनेक महिला या त्रासाला बळी पडत असून वैष्णवीच सुद्धा सासरच्या मंडळींकडून छळ केला गेला. सासू, सासरे, दीर, नणंद आणि पती यांच्यावर छळ केल्याचे आरोप आहेत. सासरची मंडळी माहेरून पैसे आणण्यासाठी सतत वैष्णवीवर दबाव टाकत होते, तिला मारहाण करत होते. या सगळ्या जाचाला कंटाळूनच वैष्णवीने आत्महत्या केली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप वैष्णवीच्या सासरच्या मंडळींनी केलाय. त्यामुळे आता पोलिसांनी तपासाची चक्रे या दिशेने हलवली आहेत. आतापर्यंत पोलीस तपासात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. 

साडी आणि पंख्याची फॉरेन्सिक तपासणी

वैष्णवी हगवणे हिचं वजन 71 किलो होतं, असं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आलंय. त्यामुळे पंखा आणि पंख्याला गुंडाळलेली साडी 71 किलो वजन पेलवू शकते का? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. त्यामुळे वैष्णवीची साडी आणि पंखा फॉरेन्सिक लॅबमध्ये ठेवण्या आले आहेत. तर याप्रकरणी अटक केलेला आरोपी निलेश चव्हाण याचा लॅपटॉप आणि मोबाईल सुद्धा तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे आता निलेश चव्हाणच्या लॅपटॉपमधून कोणते पुरावे बाहेर येणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. वैष्णवी हगवणेचा मृत्यू झाला, त्यानंतर तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा आणि मारहाणीचे व्रण दिसले. यातील काही खुणा तिच्या मृत्यूच्या 24 तास अगोदरच्या होत्या, असं पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं. तर वैष्णवीवर मृत्यूआधी शारीरिक अत्याचार झाल्याचं देखील समोर आलंय. त्यामुळे तिच्या मृत्यूप्रकरणी सुरूवातीपासूनच संशय व्यक्त केला जातोय. 


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.