अडीच कोटींची रेंज रोव्हर, 72 लाखांची जग्वार, दोन पेट्रोलपंप; महिला इन्स्पेक्टरची संपत्ती ऐकून फुटेल घाम
हवालदार असलेल्या नर्गिस खान यांची नुकतीच इन्स्पेक्टरपदी पदोन्नती झाली असून सध्या त्या बरेलीत कार्यरत आहेत. १९८९ च्या बॅचच्या इन्स्पेक्टर नर्गिस आणि त्यांचे पती सुरेश यादव यांच्याकडे 80 कोटींची मालमत्ता आहे. 2.5 कोटी रुपयांची रेंज रोव्हर, 72 लाखांची जग्वार, 28 लाखांची पजेरो अशा आलिशान कार त्यांच्याकडे आहेत. दोन पेट्रोलपंप आणि आलिशान बंगला आहे. उत्पन्नापेक्षा संपत्ती जास्त आढळल्याने त्यांच्याविरोधात भष्ट्राचाराची तक्रार दाखल आहे.
सुरेश यादव हे एका प्रकरणात कानपूर जेलमध्ये आहेत. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 1990 ते 2024 या कालावधीतील सुमारे 150 कोटींची मालमत्ता आढळली आहे. याप्रकरणी चौकशी सुरु आहे. नर्गिस आणि सुरेश यादव यांना 2021 मध्ये कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती. न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर दोघेही तुरुंगातून बाहेर आले. 80 ते 100 कोटींची बेहिशेबी मालमत्ता त्यांच्याकडे असल्याचे चौकशीत आढळले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.