गेल्या काही वर्षांत हॅकिंग आणि सायबर क्राईमच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत असते. सरकार वेळोवेळी नागरिकांसाठी अलर्ट जारी करत असते. याशिवाय टेक कंपन्या देखील वेळोवेळी गाइडलाइन्स जारी करतात, ज्यामुळे नागरिकांची हॅकर्स आणि फ्रॉडर्सपासून सुरक्षा व्हावी. आपली एखादी चूक देखील आपली संपूर्ण माहिती हॅकर्स आणि फ्रॉडर्सपर्यंत पोहोचवू शकते. ज्यामुळे क्षणार्धात आपलं बँक अकाऊंट रिकामं होऊ शकतं.
नागरिकांची फसवणूक करणारे अॅप्स
हॅकर्स आणि फ्रॉडर्स नागरिकांची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी नवीन नवीन पद्धतींचा वापर करत असतात. कधी खोटे कॉल्स तर कधी खोटे मेसेज. याशिवाय प्ले स्टोअरवर उपलब्ध असणाऱ्या खोट्या आणि फ्रॉड अॅप्समुळे देखील अनेकांची फसवणूक केली जाते. खरं तर आपण आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी प्ले स्टोअरवरून अॅप डाऊनलोड करत असतो. मात्र यातील काही अॅप्स आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतात. अशाच काही अॅप्सबाबत आता माहिती समोर आली आहे. तुमच्या स्मार्टफोनमध्ये देखील हे अॅप्स असतील तर तुम्ही ते तात्काळ डिलीट करा अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. (फोटो सौजन्य - Pinterest)
रिसर्चमध्ये फ्रॉड अॅप्सबाबत झाला खुलासा
साइबल रिसर्च एंड इंटेलिजेंस लॅब्स (CRIL) ने त्यांच्या एका रिसर्चमध्ये 20 अॅप्सबाबत खुलासा केला आहे. असं सांगितलं जात आहे की, हे सर्व अॅप्स युजर्सची पर्सनल माहिती चोरत आहेत. यामुळे युजर्सची प्रायव्हसी धोक्यात येई शकते. त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप्स असतील तर तुम्ही ते तात्काळ डिलीट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कोणत्या प्रकारचे अॅप्स धोकादायक आहेत?
CRIL ने दिलेल्या माहितीनुसार, रिसर्चमध्ये 20 अॅप्स आहेत, जे यूजर्सचा पर्सनल डेटा आणि प्रायव्हसीसाठी धोकादायक आहेत. या अॅप्समध्ये मलिशियस क्रिप्टोकरेंसी वॉलेट अॅप्स आहे. हे सर्व अॅक्टिव फिशिंग स्कॅमचा भाग आहेत आणि लोकांचा डेटा चोरत आहेत. हे बँक खात्यांसाठी देखील धोकादायक ठरू शकतात.
हे 9 अॅप्स आत्ताच स्मार्टफोनधून करा डिलीट
Suiet WalletHyperliquidPancake SwapMeteora ExchangeOpenOcean ExchangeHarvest Finance blogBullX CryptoSushiSwapRaydium
अॅप्स युजर्ससाठी कशा प्रकारे धोकादायक?
फोनवर हे अॅप्स डाउनलोड केल्यानंतर, यूजर्सना 12 इंग्रजी शब्द प्रविष्ट करावे लागतात जे रिकवरीसाठी वापरण्यास सांगितले जातात. क्रिप्टो वॉलेट्स अॅक्सेस करण्यासाठी हे 12 शब्द एंटर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 12 इंग्रजी शब्द जर हॅकर्सच्या हाती लागले, तर ते सहज यूजर्सच्या वॉलेटमध्ये प्रवेश करू शकतात. सहसा हॅकर्स व्हिडिओ टूल्स किंवा गेमिंग अॅप्सद्वारे फोनमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करतात. अॅपच्या गोपनीयता धोरणात URL लपलेली असते आणि जेव्हा ते फोनवर अॅप डाउनलोड करतात तेव्हा हॅकर्स यूजर्सच्या अकाऊंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. जर तुमच्या फोनमध्ये असे कोणतेही अॅप्स असतील तर ते त्वरित डिलीट करा आणि भविष्यात कोणत्याही लिंकद्वारे अॅप डाउनलोड करू नका. तसेच कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.